व्यावहारिक ज्ञान हवेच!

व्यावहारिक ज्ञान हवेच!
Published on
Updated on

बर्‍याच घरांत गुंतवणुकीचे निर्णय, कर्जाचे हप्ते भरणे, विमा पॉलिसीचे हप्ते भरणे, वीज बिल, टेलिफोन बिल, महापालिकेचा टॅक्स, सोसायटी मेटेनन्स आदी आर्थिक व्यवहार पुरुष मंडळींकडूनच केले जातात. यामुळे घरातील महिला या सर्व व्यावहारिक गोष्टींपासून दूर राहतात. मात्र, नवरा, वडील वा मुलाच्या अनुपस्थितीत असे व्यवहार करायची वेळ येते तेव्हा मात्र गोंधळ उडतो. अचानक नवर्‍याची बदली झाली. व्हा सगळ्या व्यावहारिक गोष्टींची माहिती होणे गरजेचे असते.

बँक व्यवहार : बँकेच्या खात्यांचे प्रकार, बचत, चालू, रिकरिंग, मुदत ठेव, चेकचे व्यवहार, डिमांड ड्राफ्ट, एसीएस क्लिअरिंग, चेक मायकर कोड नंबर, इंटरनेट बँकिंग, एटीएमने पैसे काढणे आदी प्रकार बँक व्यवहारामध्ये येतात. ते हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करायला हवा.

गृह कर्ज, वैयक्तिक कर्ज : घराकरिता किंवा गाडीकरिता कर्ज घेणे, ही आता प्रत्येकाचीच गरज झाली आहे. उपलब्ध पर्याय खूप असतात, त्यातून चाणाक्षपणे आपल्याला लाभदायी पर्याय निवडणे हे माहिती असेल तर सोपे जाते. थोड्या काळाकरिता किंवा अचानक उभ्या राहिलेल्या गरजेसाठी वैयक्तिक कर्जही अनेक बाँकांकडून मिळू शकते. त्याचीही माहिती घ्यावी.

पोस्टाच्या योजना : सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्टातील मासिक प्राप्ती योजनांना पहिली पसंती आहे आणि प्राप्तिकर बचतीसाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचा पहिला क्रमांक लागतो. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, किसान विकासपत्रे यातही खूपजण गुंतवणूक करतात. या योजनांचे व्याज दर, त्यांची किमान मुदत, कर्जाची सोय, असा तपशील समजून घ्या.

सर्वसाधारण विमा : आजारपणात रुग्णालयाचा खर्च खूपच वाढला आहे. मेडिक्लेम पॉलिसी यावेळी कामी येऊ शकते. त्यांच्या योजनांचीही माहिती करून घेऊन आपल्याला किती रकमेची पॉलिसी घ्यावी लागेल व परवडेल, याचा विचार करावा. मोटार, इतर मालमत्ता, घर, यंत्रसामग्री, संगणक आदी गोष्टी विम्यामध्ये येऊ शकतात. घरगुती कारणांसाठीही या विम्याचा फायदा होतो.

वरील सर्व विषयांची माहिती घेतली की, आपोआपच बाहेरचे व्यवहार करणे सोपे होतील. त्यामुळे जर पती, मुलगा, सासरे यांच्याशिवाय तुम्ही उत्तम प्रकारे व्यवहार करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news