हस्तमैथुन उपवासाच्या दिवशी करणं योग्य असतं का?

हस्तमैथुन उपवासाच्या दिवशी करणं योग्य असतं का?

पुढारी; ऑनलाईन डेस्क : सेक्स हा आनंदी सहजीवनाच्या अनेक रहस्यांपैकी ते एक महत्त्वपूर्ण रहस्य आहे, असे अनेक संशोधकांचे मत आहे. आनंददायी सेक्स जीवन तुम्हाला दीर्घ काळापर्यंत एकमेकांशी बांधून ठेवते. त्याच बरोबर हस्तमैथुन हाही एक जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असं लैगिक समस्या तज्ज्ञ सांगत असतात. मात्र, उपवासाच्या दिवशी हस्तमैथुन करणे योग्य असतं का? याचविषयी लैंगिक समस्या तज्ञ डॉ. राहुल पाटील यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

डॉ. राहुल पाटील सांगतात, हस्तमैथुन करणे ही स्वाभाविक क्रिया आहे. त्याने काही धोका होत नसतो. वयात येताना सतत याविषयी चुकीची माहिती कानावर पडत असते. त्यात खोट्या जाहिराती आणखी मारा करत असतात. या सर्व प्रकाराने हस्तमैथुन केल्याने खरंतर चांगला व्यायामच होत असतो. पण थकवा येतो हे सतत ऐकल्याने तसेच वाटू लागते. डोळे खोल गेले असे वाटते. प्रत्यक्षात काही वाईट परिणाम होत नाही. एकदा त्यामागील शास्त्रीय सत्य समजले की ही सगळे लक्षणे थांबतात. इथं गरज आहे लैंगिक अवयव आणि त्याची नैसर्गिक क्रिया कशी असते, हे जाणून घेण्याची. पुरुषाला असं वाटतं की यावर औषध हवे. इथेच भोंदू लोक यावर उपाय म्हणून लाखो रुपये खर्च करायला लावतात. पण शास्त्रीय माहिती दिली की पूर्ण तक्रार नाहीशी होते, हे सत्य कोण सांगत नाही.

डॉ. पाटील पुढे म्हणतात की, लोकांना दोन वेळा सेक्स केला की चांगलं वाटतं. पण दोनवेळा हस्तमैथुन केलं की ताकद कमी होते, असे अजब विचार मनात येऊ लागतात. त्यामुळे याबाबत शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे.
सेक्स, हस्त मैथुन करताना लिंग कडकपणा प्रत्येकवेळी तेवढाच असतो का?

किती दिवसांनी सेक्स किंवा हस्तमैथुन केले आहे आणि त्यावेळी कामवासना किती, कुठल्या प्रकारे वासना जास्त वाढते त्यावर तो कडकपणा आणि त्यातला ताण ठरतो. पण प्रत्येकवेळी तोच कडकपणा आलाच पाहिजे याची गरज नाही. तुलना करत राहिलो तर त्यातला आनंद घेता येत नाही. एकदमच कडकपणा नसेल तर त्याला नपुंसकता म्हणतात. कधीतरी असं झालं तर ते गंभीर असतं असं नाही. स्त्री पुरुष पहिल्या सेक्सशी तुलना करत राहतात आणि घाबरतात, अशीही माहिती डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

डॉ. पाटील सांगतात की, हस्तमैथुन करणे ही अत्यंत नैसर्गिक क्रिया आहे. निरर्थक कर्मकांडात गुंतलेला माणूस स्वतःचे मानसिक व शारीरिक नुकसान करत असतो. हे काहींना कळते, काहींना आयुष्यभर कळत नाही. उपवासाच्या दिवशी हस्तमैथुन वा सेक्स केल्याने काही फरक पडत. याबाबत गैरसमज पसरवले जातात.

हस्तमैथुन आणि स्वप्नदोष यामधे काय आहे ?

वयात आलेल्या मुलांना कामुक स्वप्न पडल्यावर झोपेत वीर्यपतन होते, त्याला स्वप्नदोष किंवा Night Fall असे म्हणतात. अर्थात हे नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याला दोष हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. आणि हस्तमैथुन म्हणजे वासना वाढल्यावर लिंगाला हाताने कुरवाळत, चोळून, घर्षण करून वीर्यपतन करणे. हाताने न करता गादीवर घर्षण करून वीर्यपतन करणे, याला देखील हस्तमैथुन म्हणतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news