iPhone 16 सिरीज लॉन्च; AI सह मिळणार 'हे' भन्नाट फीचर्स
पुढारी ऑनलाईन डेस्क : Apple ने iPhone 16 लॉन्च केला आहे. कंपनीने कॅमेरा मॉड्यूलमध्ये बदल केले आहेत. या फोनमध्ये नवीन डिझाईनसह कंपनीने पिलच्या आकाराचा डिस्प्ले दिला आहे. iPhone 16 मध्ये एक नवीन कॅमेरा कंट्रोल बटण देण्यात आले आहे आणि कॅमेऱ्यासाठी एक व्हिज्युअल इंटेलिजेंस फीचर देखील आहे.
iPhone 16 मध्ये काय खास आहे?
Apple iphone 16 A18 प्रोसेसरसह येतो. iPhone 16 आणि iPhone 16 Plus मध्ये समान फिचर्स आहेत. दोन्ही फोनमधील फरक फक्त बॅटरी आणि डिस्प्लेच्या आकारात आहे. यामध्ये तुम्हाला नवीन कॅमेरा कॅप्चर बटण देखील मिळेल. iPhone 16 ची 6.1 आणि iPhone 16 Plus ची 6.7 इंच स्क्रीन आहे. iPhone 16 चा कॅमेरा नवीन बटण स्लाइड करून नियंत्रित केला जाऊ शकतो. फोनमध्ये एक नवीन कंट्रोल बटण आहे जे टास्कसाठी कस्टमाइझ देखील केले जाऊ शकते. iPhone 16 सह A18 बायोनिक चिपसेट देण्यात आला आहे. यात पूर्वीपेक्षा चांगले न्यूरल इंजिन आहे.
आयफोन 16 सह दोन मागील कॅमेरे आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 48 मेगापिक्सेल आहे. यात मॅक्रो आणि अल्ट्रा मोड देखील आहे. कॅमेरा डॉल्बी व्हिजनसह 4K60 व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. iPhone 16 आणि iPhone 16 Plus अल्ट्रामॅरिन, टील, गुलाबी, पांढरा आणि काळ्या रंगात उपलब्ध आहेत. हे 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज पर्यायांमध्ये येतात. iPhone 16 ची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे, तर iPhone 16 Plus ची सुरुवातीची किंमत 89,900 रुपये आहे. दोन्ही फोनमध्ये AI सपोर्ट आहे. 2,000 nits च्या पीक ब्राइटनेससह XDR OLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेमध्ये सिरेमिक शील्ड संरक्षण आहे. फोनला IP68 रेटिंग मिळाली आहे.
iPhone 16 series | भारतातील किंमत किती आहे?
iPhone 16 ची प्रारंभिक किंमत सुमारे 67,000 रुपये आहे, तर iPhone 16 Plus ची किंमत सुमारे 75,500 रुपये आहे. iPhone 16 Pro ची किंमत 128GB साठी सुमारे 83,870 रुपये आणि 256GB साठी iPhone 16 Pro Max साठी सुमारे 1 लाख रुपये पासून सुरू होते. या किंमती अमेरिकन बाजारासाठी आहेत. भारतात आयफोन 16 ची किंमत 79,900 रुपये आहे आणि आयफोन 16 प्लस 89,900 रुपये आहे. दुसरीकडे, आयफोन 16 प्रो भारतात 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह येतो. सर्वात प्रीमियम आयफोन 16 प्रो मॅक्स भारतीय बाजारपेठेत किंमत 1,44900 रुपये असेल.