

Dengue Vaccine गेल्या काही प्रमाणात भारतात डेंग्यु रुग्णांचे प्रमाण वाढलेले दिसते. एडिस इजिप्ती' Aedes aegypti या डास चावल्यास मुळात डेंग्यू होतो डेंगीच्या अळ्या जरी स्वच्छ पाण्यात तयार होत असल्या तरी पाणी साठवणूक करण्याचा अयोग्य पद्धत तसेच पाण्याचे निजोजन नसने, पाणी साठवूण ठेवणे, कुलरच्या पाण्यात किंवा फ्रीजच्या पाठीमागे पाणी साठून राहिल्यास या डासांची उत्पती होते.
अचानक येणारा तीव्र ताप, डोळ्यांच्या मागे प्रचंड वेदना होणे, तीव्र डोकेदुखी. सांधेदुखी आणि स्नायूदुखी ही प्राथमिक लक्षणे असतात, कॉप्लीकेशन झाल्यास आसीयुत भरती करावे लागते प्लेटलेटस चढवावे लागतत यामुळे डे्ग्यूचे उपचार खर्चिक होऊ शकतात. पण भारतात डेग्युंची भिती कमी होणार आहे कारण भारताची पहिली स्वदेशी डेंग्यू लस (Indigenous Dengue Vaccine) आता प्रगतीच्या अंतिम टप्प्यात आहे. दिल्ली येथील 'पॅनेशिया बायोटेक' (Panacea Biotec) ही कंपनी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) च्या सहकार्याने ही लस विकसित करत आहे.
डेंगीऑल नावाची लस
भारताची पहिली स्वदेशी लस असलेल्या या लसीचे नाव 'डेंगीऑल' (DengiAll) असून ही लस आता क्लिनिकल चाचण्यांच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
ही लस विकसित करण्यासाठी ICMR (भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद) तांत्रिक आणि संशोधनात्मक मदत करत आहे. पॅनेशिया बायोटेक कंपनीकडून सध्या १०,००० पेक्षा जास्त स्वयंसेवकांवर याची चाचणी सुरू आहे. ही लस 'सिंगल डोस' (एकदाच घ्यायची) असण्याची शक्यता आहे. या लसीबरोरबर इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (IIL): या सरकारी मालकीच्या कंपनीनेही आपल्या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी केल्या असून, ती देखील २०२६-२७ पर्यंत लस बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. 'कोविशिल्ड' बनवणारी त्यानंतर सीरम ही कंपनी देखील डेंग्यूच्या लसीवर (Dengusiil) काम करत असून, सध्या त्यांच्या चाचण्या प्रगत टप्प्यात आहेत.
लस घेतल्यास डेंग्यू होणार नाही, झालाच तर तो गंभीर स्वरूप धारण करु शकणार नाही भारतात डेंग्यूचे चार वेगवेगळे प्रकार (Serotypes) असल्यामुळे त्यावर प्रभावी लस बनवणे हे शास्त्रज्ञांसमोर मोठे आव्हान होते, कोरोनासारखे ही लस काम करणार आहे. डेंग्यूचा कमकूवत विषाणू शरीरात जाणार आहे. त्यामुळे भविष्यात डेग्यूचा विषाणू शरीरात शिरला शरीराची रोगप्रतिकारशक्ती या विषाणूंना 'शत्रू' म्हणून ओळखते. त्यानंतर आपली सिस्टीम त्याविरुद्ध विशिष्ट 'अँटीबॉडीज' (Antibodies) आणि 'मेमरी सेल्स' तयार करुन लढू शकते. त्यामुळे डेग्यू होणार नाही आणि झालाच तर पेशंटची क्रिटीकल कंडीशन होणार नाही. थोड्याशा उपचाराने बरा होऊन जाईल
डेंग्यू झाल्या नंतरची लक्षणे त्रासदायक
डेंग्यू झाल्यावर रुग्णांवर मोठ्या प्रमाणात ॲन्टीबायोटीक, प्लेटलेटस चढवले तर खूप त्रास होतो. उपचारानंतर काही महिने दिसणारी लक्षणे खूप त्रासदायक असतात. तीव्र थकवा (Fatigue): थोड्याशा कामानेही प्रचंड थकवा जाणवणे. हे लक्षण ३-४ महिने राहू शकते. केस गळणे, हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये दीर्घकाळ कळ लागणे चिडचिड होणे, नैराश्य (Depression) किंवा कामात लक्ष न लागणे प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे लोंकामध्ये डेंग्यूची भिती असते.