

सकारात्मक ऊर्जा आणि शांत वातावरण निर्माण करण्यासाठी घरात धूप लावणे ही आपली जुनी परंपरा आहे. बाजारात अनेक प्रकारचे धूप उपलब्ध असले तरी, त्यात रसायनांचा वापर केला जातो. पण, गायिका आणि 'कोकणी' कंटेंट क्रिएटर स्वनांदी सरदेसाई यांनी त्यांच्या एका व्लॉगमध्ये घरच्या घरी नैसर्गिक आणि पवित्र धूप कसा तयार करायचा, याची सोपी पद्धत सांगितली आहे. हा धूप पूर्णपणे नैसर्गिक व आयुर्वेदिक घटकांपासून बनलेला असल्यामुळे तो कोणत्याही रसायनांशिवाय वातावरण शुद्ध करतो.
हा धूप बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य नैसर्गिक आहे.
कोळसा: कोळश्याची बारीक पावडर तयार
शेण: गाईच्या शेणाचा वापर या धूपामध्ये मुख्य घटक म्हणून केला जातो.
भीमसेनी कापूर: कापूर वातावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो.
चंदन पावडर: चंदनाचा सुगंध शांत आणि पवित्र मानला जातो.
गुग्गुळ: गुग्गुळ हा एक आयुर्वेदिक घटक आहे, जो वातावरणाची शुद्धी करतो.
नागरमोथा: याचा उपयोग सुगंध आणि औषधी गुणधर्मांसाठी होतो.
सुगंधी कचोरा: हा घटक सुगंध आणि त्वचेच्या आरोग्यासाठी वापरला जातो.
बावची पावडर: हे आयुर्वेदिक घटक अनेक औषधांमध्ये वापरले जाते.
मरवा (मरुआ): याला 'मारजोरम' असेही म्हणतात आणि याचा सुगंध अतिशय शांत असतो.
तूप: शुध्द देशी गायीच्या तुपामुळे सर्व घटक एकत्र मिसळण्यास मदत होते.
सर्व घटकांचे मिश्रण: सर्वात आधी कोळश्याची बारीक पावडर कारून घ्या, ही राख एका मोठ्या भांड्यात घ्या. त्यात चंदन पावडर, नागरमोथा, सुगंधी कचोरा, बावची पावडर आणि मरवा हे सर्व घटक एकत्र करून चांगले मिसळा.
गुग्गुळ आणि तुपाचा वापर: या मिश्रणात गुग्गुळ पावडर टाका आणि नंतर हळूहळू ओले शेण घाला सर्व घटक एकत्र मळून घ्या, मिश्रण एक गोळा होईल इतकेच तूप घाला आणि त्याचे गोळे तयार करा.
धूपला आकार द्या: तयार झालेल्या मिश्रणाचे छोटे गोळे किंवा बोट्या (sticks) तयार करा.
सुकवणे: तयार झालेले धूप गोळे किंवा बोट्या उन्हात किंवा हवेशीर ठिकाणी चांगले सुकवून घ्या.
वापर: पूर्णपणे सुकल्यानंतर हा धूप तुम्ही पूजेसाठी किंवा घराचे वातावरण शुद्ध करण्यासाठी वापरू शकता.
हा नैसर्गिक धूप तयार करणे खूप सोपे आहे आणि त्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे केवळ घरात सुगंधच पसरत नाही, तर सकारात्मक ऊर्जा आणि शांतता टिकून राहते.