पुढारी वृत्तसेवा
उपवासाचे खरे कारण:
उपवास म्हणजे शरीराला आराम देणे आणि त्याची शुद्धी करणे. ऋतू बदलताना शरीर नवीन वातावरणासाठी तयार होण्यासाठी उपवास करणे फायदेशीर ठरते.
विल पॉवर आणि सकारात्मक ऊर्जा:
जे नऊ दिवस उपवास करतात त्यांची विल पॉवर (Will Power) खूप वाढते. त्यांच्यातील 'ओंकार शक्ती' जागृत झाल्याने ते तेजस्वी आणि ऊर्जावान दिसतात.
शरीराचा 'इंटर्नल ग्लो':
उपवास करताना आपण फळे, सुकामेवा आणि दूध यांसारखे पचायला सोपे आणि हलके पदार्थ खातो. यामुळे शरीरातील पोषण पातळी संतुलित राहते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक चमक येते.
केस आणि त्वचेसाठी फायदा:
उपवासादरम्यान हलका आहार घेतल्याने केस आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. शरीर डिटॉक्स झाल्यामुळे त्वचेचा ग्लो वाढतो.
पचनशक्तीला आराम:
उपवासामुळे पचनसंस्थेला (Digestive System) आराम मिळतो. यामुळे पचनक्रिया अधिक कार्यक्षम होते आणि शरीर आतून स्वच्छ होते.
फक्त पाणी पिऊनही फ्रेश:
विल पॉवर आणि आंतरिक ऊर्जेमुळे अनेक लोक फक्त पाणी पिऊनही दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहू शकतात.
रसधातुवर्धक आहार:
उपवासातील फळे, दूध आणि सुकामेवा हे 'रसधातुवर्धक' असतात, म्हणजेच ते शरीराला आवश्यक पोषण देतात आणि रक्ताभिसरण सुधारतात.
उपवासाचा अर्थ 'फस्टिंग':
'फस्टिंग' म्हणजे शरीराला काही काळासाठी विश्रांती देणे, जेणेकरून शरीर स्वतःची दुरुस्ती करू शकेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकेल.
आयुर्वेदाचा दृष्टिकोन:
आयुर्वेद उपवासाला एक आरोग्यदायी सवय मानतो, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारते.