प्रेशर कुकरमधून वाफ लीक होतेय? नवीन रबर घेण्यापूर्वी हे ४ घरगुती उपाय करा; काही मिनिटांत पुन्हा शिट्टी वाजेल!

प्रेशर कुकरमधून वाफ लीक होतेय? नवीन रबर घेण्यापूर्वी 'या' ट्रिक्स वापरा..
pressure cooker rubber loose gasket gas leak desi jugaad
प्रेशर कुकरमधून वाफ लीक होतेय? नवीन रबर घेण्यापूर्वी हे ४ घरगुती उपाय करा; काही मिनिटांत पुन्हा शिट्टी वाजेल!file photo
Published on
Updated on

how to fix pressure cooker rubber loose gasket gas leak desi jugaad kitchen hacks pressure cooker rubber loose leakage problem easy home remedies

पुढारी ऑनलाईन : प्रेशर कुकरमधून वाफ बाहेर येत असेल, शिट्टी वाजत नसेल आणि अन्न शिजायला जास्त वेळ लागत असेल, तर त्यामागे बहुतेकदा कुकरचे रबर सैल होणे किंवा जुने होणे हे कारण असते. मात्र नवीन रबर खरेदी करण्यापूर्वी काही सोपे घरगुती उपाय करून ही समस्या तात्पुरती कमी करता येऊ शकते.

pressure cooker rubber loose gasket gas leak desi jugaad
LPG cylinder : "तुमचा LPG सिलेंडर लवकर संपतोय? रोजच्या 'या' 10 सवयी बदला.. होईल मोठी गॅस बचत!"

कधी असे झाले आहे का, की घाईत स्वयंपाक करताना तुम्ही कुकरमध्ये डाळ किंवा भाजी ठेवून झाकण लावता आणि काही मिनिटांत जेवण तयार होईल, अशी अपेक्षा करता? पण त्याच वेळी कुकरमधून हळूहळू वाफ बाहेर येऊ लागते. शिट्टी नीट वाजत नाही, प्रेशर तयार होत नाही आणि अन्न शिजायला जास्त वेळ लागतो.

यामागील मुख्य कारण म्हणजे कुकरचे रबर सैल होणे किंवा त्याची झीज होणे. सतत वापर आणि गरम वाफेच्या संपर्कामुळे कालांतराने रबरची पकड कमी होते. त्यामुळे झाकण व्यवस्थित सील होत नाही आणि वाफेची गळती होउ लागते. अशावेळी लगेच नवीन रबर किंवा नवीन कुकर घेण्याची गरज नसते. काही सोपे घरगुती उपाय करून ही समस्या तात्पुरती कमी करता येते.

बर्फाच्या पाण्याचा उपाय

रबर वारंवार गरम झाल्यामुळे सैल पडू शकते. अशावेळी रबर काढून बर्फ घातलेल्या थंड पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवा. थंड तापमानामुळे रबर थोडे आकसते आणि त्याची पकड काही प्रमाणात सुधारू शकते.

pressure cooker rubber loose gasket gas leak desi jugaad
घरातील 'या' 5 गोष्टी सापांना चुंबकासारख्या आकर्षित करतात, वेळेत दूर करा नाहीतर अंगण बनेल सापांचे घर

फ्रीजरची ट्रिक

घरात बर्फ उपलब्ध नसेल, तर रबर स्वच्छ धुऊन पूर्ण कोरडे करा आणि ते २० ते ३० मिनिटांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. बाहेर काढल्यानंतर लगेच झाकणात बसवा. त्यामुळे रबर तात्पुरते घट्ट होण्यास मदत होऊ शकते.

कणकेचा तात्पुरता उपाय

अत्यंत गरज असल्यास आणि त्वरित स्वयंपाक करायचा असल्यास, ज्या ठिकाणाहून वाफ बाहेर येत आहे त्या भागावर थोडासा मळलेला कणकेचा पातळ थर लावू शकता. तो तात्पुरत्या सीलप्रमाणे काम करू शकतो. मात्र शिट्टीचे छिद्र (व्हेंट ट्यूब) अजिबात बंद होणार नाही, याची विशेष काळजी घ्या.

थोडे तेल किंवा तूप लावा

रबर कोरडे पडल्यामुळेही ते झाकणाला व्यवस्थित चिकटत नाही. अशावेळी रबर स्वच्छ करून त्यावर बोटांनी अगदी हलका तेल किंवा तुपाचा थर लावा आणि पुन्हा झाकणात बसवा. त्यामुळे त्याची पकड सुधारण्यास मदत होऊ शकते.

रबर जास्त काळ चांगले राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

वेळोवेळी रबर स्वच्छ करून कोरडे ठेवा.

स्वयंपाक झाल्यानंतर कुकरचे झाकण उलटे ठेवा.

रबरला अनावश्यक ताण देऊ नका आणि जास्त उष्णतेच्या संपर्कात ठेवणे टाळा.

रबर खूप झिजलेले, तडे गेलेले, कठीण किंवा विकृत झाले असेल, तर ते दुरुस्त करण्याऐवजी नवीन, योग्य दर्जाचे रबर वापरणेच सुरक्षित आहे.

महत्त्वाची सूचना: वाफ गळणारा प्रेशर कुकर वापरणे धोकादायक ठरू शकते. वरील उपाय हे केवळ तात्पुरते आहेत. कुकरची गॅस्केट (रबर), सेफ्टी व्हॉल्व्ह किंवा शिट्टी खराब असल्यास ती बदलणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे.

logo
Pudhari News
pudhari.news