Washing jeans tips: पँट किती दिवसांनी धुवावी? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' महत्त्वाचे नियम; जाणून घ्या योग्य पद्धत

Washing jeans tips
Washing jeans tipspudhari
Published on
Updated on

How often to wash pants guide : कपड्यांवर दृश्य डाग दिसले की आपण ते धुतो, पण 'प्रॉक्टर अँड गॅम्बल'च्या फॅब्रिक सायंटिस्ट किम रोमाईन यांच्या मते, घामातील अदृश्य घटक आणि शरीरातील तेल कापडामध्ये साठत राहते. यामुळे कापड तेलकट किंवा कडक होते. हे टाळण्यासाठी पँटच्या प्रकारानुसार ती धुणे आवश्यक आहे.

Washing jeans tips
new clothes wash before wearing: मॉल, दुकानातून घेतलेले नवीन कपडे धुतल्यानंतरच वापरले पाहिजे का?

कोणती पँट कधी धुवावी?

योगा पँट्स आणि लेगिंग्स: या पँट्स थेट त्वचेच्या संपर्कात असतात आणि व्यायाम करताना घाम शोषतात. त्यामुळे प्रत्येक वापरानंतर त्या धुणे अनिवार्य आहे. अन्यथा त्वचेला जळजळ किंवा संसर्ग होऊ शकतो.

जीन्स (Denim): जीन्स वारंवार धुण्याची गरज नसते. तज्ज्ञांच्या मते, साधारण ५ ते ७ वापरानंतर किंवा अगदी महिन्याभरातून एकदा जीन्स धुतली तरी चालते. यामुळे तिचा रंग आणि पोत टिकून राहतो.

पायजमा (Pajamas): जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करत असाल, तर पायजमा २-३ दिवस वापरता येतो.

लिनन आणि कॉटन पँट्स: लिननच्या पँट्स १-२ वापरानंतर धुवाव्यात, कारण या कापडातून घाम लवकर बाहेर पडत नाही.

खाकी आणि चीनोज: या पँट्स २-३ वापरानंतर धुणे योग्य ठरते. जास्त वेळा धुतल्यास कापड कमकुवत होते.

Washing jeans tips
Hair Regrowth: केस पुन्हा उगवण्यासाठी डोक्याची मालिश कशी करावी? योग्य पद्धत जाणून घ्या

धुताना 'या' चुका टाळा

पँट उलटी करा: पँट नेहमी उलटी करून धुतल्यास बाहेरील भागाचा रंग उडत नाही आणि आतील बाजूने साठलेला घाम व तेल अधिक प्रभावीपणे निघून जाते.

ड्रायरचा वापर टाळा: कापड खराब होण्यासाठी धुण्यापेक्षा 'ड्रायर'ची उष्णता अधिक कारणीभूत ठरते. पँट नैसर्गिक हवेत वाळवणे (Air-dry) सर्वात उत्तम आहे.

थंड पाण्याचा वापर: शक्यतो थंड आणि नाजूक सायकलवर (Delicate cycle) कपडे धुवावेत.

Washing jeans tips
Summer Clothing Colors | उन्हाळ्यात कोणत्या रंगांचे कपडे वापरावेत?

जर पँटवर रसायने, रक्त किंवा इतर दूषित घटक सांडले असतील, तर ती इतर कपड्यांपासून वेगळी आणि तातडीने धुवावी. तसेच, जे लोक अंतर्वस्त्रांशिवाय पँट घालतात, त्यांनी ती प्रत्येक वापरानंतर धुणे स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news