

दोन काकड्या, दोन वाट्या पोहे, सुकं खोबरं, चवीनुसार मिरच्या, लिंबू, तेल, मोहोरी, हिंग, साखर, मीठ.
सगळ्यात आधी छोट्या असल्यास तीन, मोठ्या असल्यास दोन काकड्या सोलून जाडसर किसून घ्या. सुक्या खोबर्याचाही जाडसर कीस करून घ्या. जाड पोहे चाळून घ्या. मग पाण्यात भिजवून निथळून घ्या. मिरच्या चिरून घ्या. आता ओलसर पोह्यात काकडीचा आणि खोबर्याचा कीस घालून नीट कालवून घ्या आणि दहा-बारा मिनिटं झाकून ठेवा. मग दुसरीकडे तेलात मोहरी, मिरची आणि हिंग घालून फोडणी करा. ही फोडणी काकडी व खोबरं घातलेल्या पोह्यांवर घाला. त्यात चिमूटभर साखर, मीठ घाला. वरून लिंबू पिळा आणि तयार झालेले हे चविष्ट पोहे खायला घ्या