Fasting: उपवासाला ‘ड्रायफ्रुट’ खाण्याचे हे होतील फायदे | पुढारी

Fasting: उपवासाला 'ड्रायफ्रुट' खाण्याचे हे होतील फायदे

पुढारी ऑनलाईन डेस्क:  आहाराचा आपल्या आरोग्यावर होत असतो. उपवासाला आपण सर्वसामान्यपणे साबुदाणा खिचडी, वरई, चहा हेच पदार्थ आणि पेय घेत असतो; पण यातील काही पदार्थ हे पचनाला जड आणि शरीरात उष्णता निर्माण करू शकते. त्यामुळे उपवसादरम्यान आपण ड्रायफ्रुट खाणे देखील फायदेशीर ठरू शकते.  हे ड्रायफ्रुट दुधासोबत खाल्याने उपवासाच्या दिवसात देखील तुम्हाला पौष्टिक आणि सकस आहार मिळून, शरीरातील उर्जा टिकून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे तुम्हाला जसे शक्य आहे तसे खारीक, मनुका, बदाम, अंजीर, अक्रोड, खजूर, काजू यांसारखे ड्रायफ्रुट तसेच किंवा दुधासोबत खाणे फायदेशीर ठरेल.

मनुका

मनुक्याचे आरोग्यदायी फायदे

मणुकांमध्ये अनेक पोषक घटक असतात. मूठभर मनुका खाऊन त्यावर पाणी प्यायल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. अशक्तपणा, अ‍ॅनिमियासारख्या आजारांवर मनुका गुणकारी आहे. मणुका गोड असल्याने उपवासाच्या दिवसात खाल्यास अशक्तपणा जाणवत नाही. मनुका दुधामध्ये शिजवून खाल्यास देखील आरोग्यदायी ठरते. रात्री झोपण्यापूर्वी काळा मनुका भिजवून सकाळी उठल्यानंतर खाल्यास पोटाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

बदाम

बदामाचे आरोग्यदायी फायदे

बदाम हे पौष्टिक आणि बुद्धीसाठी उपयुक्त असून, रात्री एक कप कोमट दुधात बदाम भिजत घालत सकाळी अनोशापोटी दुधासह त्यांचे सेवन करावे. यामुळे शारीरिक क्षमता आणि स्‍मरण दोन्हीही वाढते. बदाममध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी ॲसिड्स यासारखे अनेक पोषकतत्वे असतात, त्यामुळे बदाम पाण्यात भिजवून खाणेसुद्धा फायदेशीर ठरते.

अंजीर

अंजीरचे आरोग्यदायी फायदे

ओलं किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ताज्या अंजीरापेक्षा सुक्या अंजीरामध्ये साखर, क्षार घटक मुबलक प्रमाणात असतात. तसेच सुक्या अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए, के, सी आणि मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम, कॉपर, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल इत्यादी गुणधर्म असतात. त्यामुळे गरम दुधात कोरडे अंजीर टाकून प्यायल्याने शरीराला अधिक फायदे होतात.

खजूर

खजूराचे आरोग्यदायी फायदे

शरीरातील उर्जा टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी गोड फळांबरोबर ड्रायफ्रुट्स देखील तितकेच महत्वाचे आहेत. खजूरामध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. खजूर हा ऊर्जा, साखर, आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि जस्त मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खारीक खाणे आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण अन्न देखील ठरते.

काजू

काजूचे आरोग्यदायी फायदे

चवीला काहीसा गोड आणि खुसखुशीत काजू सर्वांना आवडतो. तसेच यामुळे शरीराला देखील त्याचे तितकाच फायदा होतो. काजू पौष्टिक घटकांनी समृद्ध असून शरीराला भरपूर ऊर्जा देतो. म्हणूनच त्याला ऊर्जेचे पॉवरहाऊस म्हटले जाते. गरम दुधामध्ये काजूचे तुकडे टाकून ते चावून खाल्यास हे उपवासामध्ये हे सकस आणि पौष्टिक ठरू शकते.

खारीक

खारकीचे आरोग्यदायी फायदे

खारीकीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टीक घटक असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात. खारीकीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरी असल्याने, दोन खारीकांमुळेसुद्धा आपल्याला दिवभराची ऊर्जा मिळते. उपवासादिवशी दुधामध्ये खारीक भिजवून खाल्याने किंवा खारीक बारीक करून ती दुधामधून खाल्याने शरीराला आरोग्यदायी ठरू शकते.

Back to top button