

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी पहिली दिवाळी (First Diwali After Marriage) खूप खास असते. दिवाळी पाडव्याला पत्नी आपल्या नवऱ्याचे औक्षण करते, तेव्हा तिला 'ओवाळणी' (Diwali Padwa Gift) म्हणून काय द्यावं, हा प्रश्न अनेक नवऱ्याला पडतो.
दागिने आणि कपडे हे नेहमीचेच झाले. पण तुमच्या पत्नीला स्पेशल आणि भावनिक आनंद देणारे गिफ्ट देऊन ही दिवाळी अधिक सुंदर बनवता येते. खासकरून, कुटुंबाची आणि घराची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पत्नीच्या मानसिक आरोग्यासाठी (Mental Health) आणि तिला स्वतःच्या आवडीसाठी वेळ मिळावा, यासाठी काही हटके कल्पना
1. 'वीकेंड ब्रेक' किंवा स्पा वाऊचर: घरातील कामातून तिला आराम मिळावा यासाठी, जवळपासच्या छान रिसॉर्टमध्ये दोन दिवसांची अचानक 'सरप्राईज' ट्रीप (Surprise Trip) किंवा शहरातल्या चांगल्या स्पा (Spa) मध्ये बॉडी मसाजचं वाऊचर द्या. 'थोडा आराम कर, मी आहे सगळं बघायला', ही भावना तिला लाखमोलाची वाटेल.
2. छंदात मदत करणारं गिफ्ट: तिची एखादी जुनी आवड किंवा छंद (Hobby) असेल, जो लग्नानंतर मागे पडला असेल, तर त्याला पुन्हा प्रोत्साहन द्या.
उदा. तिला पेंटिंगची आवड असेल, तर चित्रकलेचे साहित्य किंवा एखादा ऑनलाइन कोर्स (Online Course) घेऊन द्या.
तिला वाचनाची आवड असल्यास, एका छान पुस्तकांच्या सेटसह (Book Set) आरामदायक झोपाळा (Hammock) किंवा रीडिंग कॉर्नरची जागा तयार करून द्या.
3. 'मेमरी' जपणारे पर्सनलाईज्ड गिफ्ट्स: तुमच्या नात्यातील गोड आठवणी जपणारे गिफ्ट्स नेहमीच भावूक करणारे असतात.
कस्टमाईज्ड फोटो अल्बम किंवा फ्रेम: तुमचे खास फोटो किंवा लग्नातील आठवणींचे क्षण असलेला फोटो अल्बम किंवा नाव कोरलेली फोटो फ्रेम द्या.
लव्ह लेटर: आजच्या डिजिटल युगात, तुमच्या भावना कागदावर उतरवून हाताने लिहिलेले एक प्रेमपत्र (Love Letter) तिला द्या. ही भेट तिला आयुष्यभर जपायची इच्छा होईल.
4. हेल्थ आणि टेक्नॉलॉजी: तिची हेल्थ आणि कामांची सोय व्हावी यासाठी स्मार्टवॉच (Smartwatch) किंवा फिटनेस ट्रॅकर (Fitness Tracker) द्या. ज्यामुळे तिची धावपळ कमी होऊन तब्येतीकडे लक्ष देणे सोपे होईल.
5. सोबत वेळ घालवा: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला पूर्ण वेळ द्या. कॅंडल लाईट डिनरची (Candlelight Dinner) तयारी करा किंवा तिच्या आवडत्या ठिकाणी फिरायला घेऊन जा. तिला विचारा, 'या दिवाळीत तुला काय हवंय?' आणि तिच्या आवडीनुसार एक भेट निवडा.