Fathers Day 2026 : पित्‍याने वयाच्या ५० वर्षांपूर्वी करावेत हे 7 Financial Planning, त्यामुळे मुलांचे भविष्य होईल सुरक्षित

मुलांचे शिक्षण, करिअर आणि लग्न यांसारख्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी केवळ कमाई करणे पुरेसे नसते, तर योग्य वेळी आर्थिक नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे..
Fathers Day 2026
Fathers Day 2026 : पित्‍याने वयाच्या ५० वर्षांपूर्वी करावेत हे 7 Financial Planning, त्यामुळे मुलांचे भविष्य होईल सुरक्षितfile photo
Published on
Updated on

every father should complete these 7 financial planning steps before the age of 50 to ensure a secure future for their children fathers day 2026

पुढारी ऑनलाईन : जर ५० वर्षांचे होण्यापूर्वी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले, तर मुलांचे भविष्य सुरक्षित होण्यासोबतच निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागणार नाही.

Fathers Day 2026
RBI profit and autonomy | आरबीआयचा नफा आणि स्वायत्तता

मुलांचे शिक्षण, करिअर आणि लग्न यांसारख्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी केवळ कमाई करणे पुरेसे नसते, तर योग्य वेळी आर्थिक नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. अनेक वडील कुटुंबाच्या गरजांमध्ये इतके व्यस्त होतात की भविष्यासाठीची आर्थिक तयारी पुढे ढकलतात.

जर ५० वर्षांचे होण्यापूर्वी काही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले, तर मुलांचे भविष्य सुरक्षित होण्यासोबतच निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागणार नाही.

मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र निधी तयार करा

उच्च शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांच्या शिक्षणासाठी SIP किंवा इतर गुंतवणूक पर्यायांच्या मदतीने स्वतंत्र निधी तयार करा, जेणेकरून गरज पडल्यास शिक्षण कर्जाचा भार उचलावा लागणार नाही.

Fathers Day 2026
Unclaimed Financial Assets: विसरलेले पैसे शोधण्याची सुवर्णसंधी! सरकारने सुरू केले नवे पोर्टल; एका मिनिटात करा तपास

आपत्कालीन निधी (Emergency Fund) तयार ठेवा

किमान ६ ते १२ महिन्यांच्या खर्चाइतका आपत्कालीन निधी राखून ठेवा. नोकरी जाणे, आजारपण किंवा इतर कोणत्याही आकस्मिक परिस्थितीत हा निधी कुटुंबाला आर्थिक संकटापासून वाचवू शकतो.

आरोग्य विम्याकडे दुर्लक्ष करू नका

वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे कुटुंबाची बचत कमी होऊ शकते. स्वतःसह पत्नी आणि मुलांसाठी पुरेशा कव्हरचा आरोग्य विमा घेणे अत्यंत आवश्यक आहे.

कर्ज कमी करण्यावर भर द्या

५० वर्षांचे होईपर्यंत गृहकर्ज किंवा इतर मोठी कर्जे कमी करण्याचा प्रयत्न करा. कमी कर्जामुळे भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या सहज पार पाडता येतात.

मृत्युपत्र (Will) आणि नामनिर्देशन (Nomination) अद्ययावत ठेवा

मालमत्तेचे योग्य हस्तांतरण होण्यासाठी मृत्युपत्र तयार करा. तसेच सर्व बँक खाती, विमा पॉलिसी आणि गुंतवणुकींमध्ये नामनिर्देशित व्यक्तीची माहिती अद्ययावत ठेवा, जेणेकरून पुढे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

निवृत्तीचे नियोजन करा

अनेकजण मुलांच्या भविष्यासाठी योजना करतात; मात्र स्वतःच्या निवृत्तीचे नियोजन विसरतात. EPF, PPF आणि म्युच्युअल फंड यांसारख्या पर्यायांमध्ये नियमित गुंतवणूक करून निवृत्तीसाठी भक्कम निधी तयार करता येतो.

टर्म इन्शुरन्स घ्या

कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी टर्म इन्शुरन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. कुटुंबाचा प्रमुख कमावता सदस्य नसल्यास कुटुंबावर आर्थिक संकट येऊ नये यासाठी योग्य रकमेचा टर्म प्लॅन असणे गरजेचे आहे.

RBI ने आर्थिक उत्पादनांच्या विक्रीसंदर्भात नियम कडक केले

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँका आणि नियमनाधीन संस्थांकडून (Regulated Entities) आर्थिक उत्पादने व सेवांच्या विक्रीसंदर्भातील नियम अधिक कडक केले आहेत. या निर्णयाचा उद्देश कर्जदाता संस्थांकडून होणारी चुकीची विक्री (Mis-selling) रोखणे, दिशाभूल करणाऱ्या विपणन पद्धतींवर आळा घालणे तसेच ग्राहकांची संमती, माहितीचे प्रकटीकरण (Disclosure) आणि विक्री प्रक्रियेबाबतचे नियम अधिक कठोर करणे हा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news