ऑर्गनायझर : एक खुणावते करिअर

Published on
Updated on

तुम्हाला लोकांबरोबर काम करायला आवडते का? तुमच्यामध्ये उद्योजकतेचे मूळ आहे का? मग व्यावसायिक व्यवस्थापक म्हणजेच ऑर्गनायझर म्हणून करिअरचा उत्तम पर्याय आपल्यापुढे आहे.

तुमच्यामध्ये व्यवस्थापन कौशल्य असेल तर तुमच्यासाठी एक चांगला करिअरचा पर्याय आहे, ऑर्गनायझर. एखाद्या समारंभाची तारीख नोंदवून ठेवणे किंवा मीटिंगची तारीखही वेळच्या वेळी लिहून ठेवण्याची सवय असेल तर आपण या कामासाठी योग्य व्यक्ती आहात.

रिक्रूटर : कंपनीचा रिक्रूटर म्हणून काम करताना नोकरीसाठी हुशार कर्मचार्‍यांची निवड करावी लागेल. कंपनीत काम करण्यायोग्य, हुशार मनुष्यबळाची पारख करण्याचे काम रिक्रूटर करतो. यासाठी आपल्यामध्ये व्यावसायिक नातेसंबंध जपणे, विश्लेषण करणे, मोठे लक्ष्य मांडणे यांसारखे कौशल्यही हवे. तसेच पाठपुरावा करण्याचा गुणही असायला हवा.

व्यवस्थापक : कोणतेही काम, प्रकल्प व्यवस्थित, अडचणविरहित सुरू राहण्यासाठी व्यवस्थापक महत्त्वाचा असतो. व्यवस्थापक म्हणून काम करताना आपल्याला प्रकल्पाच्या मोठ्या आणि छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागते. अतिशय व्यावसायिकता बाळगून ठरलेल्या आर्थिक नियोजनांतर्गत योग्य प्रकारे वेळेत प्रकल्प पूर्ण करून देणे हे एक आव्हान असते. त्यामुळेच व्यवस्थापक म्हणून काम करताना काही महत्त्वाची कौशल्ये असायला हवी. व्यवस्थापन कौशल्य, नेतृत्वगुण, सहकार्य कौशल्य, सारासार विचार कौशल्य, वित्तपुरवठा कौशल्य यांसोबतच प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य असणे आवश्यक आहे.

ट्रॅव्हल एजंट : कोरोनानंतर पुन्हा एकदा टुरिझमला बहर येत आहे. अनेकांना पर्यटनस्थळी जायचे असते. पण कसे जायचे, कुठे राहायचे हे काहीच माहीत नसते. त्यामुळे अशा लोकांना त्यांची ट्रिप आखून देण्याचे काम आपण करू शकतो. अर्थात यामध्ये वेगळेपणाला खूप महत्त्व आहे. प्रवासाला गेल्यानंतर त्या ठिकाणची वैशिष्ट्ये शोधावी लागतात. तिथल्या नेहमीच्या लोकप्रिय स्थळांपासून जरा हटके जागा शोधाव्या लागतात. तिथली इत्थंभूत माहिती मिळवावी लागते. थोडक्यात चौकस बुद्धीचा आणि कौशल्याचा वापर करून उत्तम ट्रॅव्हल एजंट बनता येते.

पर्यटकांना जगभरातील विविध ठिकाणांच्या सहली आयोजित करून देण्यासारखे काम आपण करू शकतो. भरपूर फिरणे, पर्यटन स्थळे पालथी घालणे किंवा किमान तिथली सर्व माहिती असणे या गोष्टी ट्रॅव्हल एजंटला कराव्या लागतात. सहल आयोजित करताना त्या जागेची तपशीलवार माहिती लोकांना देणे गरजेचे असते. ट्रॅव्हल एजंट होण्यासाठी काही प्रशिक्षण अभ्यासक्रमही सुरू झाले आहेत.

इव्हेंट मॅनेजर : आजच्या काळात घरगुती छोट्या समारंभांसाठीही अनेक जण इव्हेंट मॅनेजरची मदत घेतात. हे समारंभ आकर्षकपणे अरेंज करणे, येणार्‍या पाहुण्यांचे मनोरंजन होईल यासाठीच्या विविध योजना राबवणे, आसन व्यवस्था, भोजन व्यवस्था यांसह छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेऊन समारंभ संस्मरणीय करण्याचे काम इव्हेंट मॅनेजर करत असतो. खर्चाचा योग्य ताळेबंद, पाहुण्यांची यादी, निवासव्यवस्था आदी गोष्टींचे व्यवस्थापन या व्यक्तीला करावे लागते. एकूणच ऑर्गनायझर म्हणून काम करताना उत्कट आवड किंवा पॅशन हा एकमेव गुण असले पाहिजे. या जोडीला नव्या कल्पना, वेळेचे सुव्यवस्थापन कौशल्य आणि कामाच्या वेळेत लवचिकता याचीही गरज लागतेच.

विधिषा देशपांडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news