CBSE Exam : रेग्युलर विद्यार्थांना शाळेतून कलेक्ट करावे लागणार हॉल तिकीट

CBSE Exam : रेग्युलर विद्यार्थांना शाळेतून कलेक्ट करावे लागणार हॉल तिकीट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीबीएससीकडून दुसऱ्या सेमिस्टरच्या परीक्षा २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत. दरम्यान विद्यार्थ्यांचा त्रास कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. cbse.gov.in. अधिक माहिती आणि अपडेट मिळवण्यासाठी असेल असे सांगण्यात आले आहे.

सीबीएसईकडून १० वी आणि १२ वीच्या सेमिस्टर २ च्या परिक्षेचे एडमिट कार्ड संकेतस्थळावर जारी केले आहेत. सीबीएसई बोर्डाकडून रेग्युलर आणि प्रायव्हेट दोन्ही विभागातील विद्यार्थ्यांसाठी एडमिट कार्ड जारी केले आहेत. (CBSE Exam)

दरम्यान रेग्युलर असणाऱ्या विद्यार्थांना हॉल तिकीट शाळेकडून देण्यात येणार आहे. याचबरोबर त्या हॉल तिकीटावर प्रिन्सीपल यांची सही, शाळेचा कोड, आयडी आणि पासवर्ड या सगळ्या गोष्टी नमूद असणार आहेत. तर प्रायव्हेट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना स्वत: हून हॉल तिकीट डाऊनलोड करावे लागणार आहे. दरम्यान ही परिक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.

CBSE Exam : महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे

कोरोनाच्या नियमांमध्ये शिथीलता दिल्याने सेमिस्टर १ ला १२ विद्यार्थांना वर्गात बसण्याची परवानगी होती ती आता १८ करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स, मास्क आणि टेम्परेचर तपासणी याचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी बोर्डाने तीन-टप्प्यात व्हेरीफिकेशन प्रक्रिया अनिवार्य केली आहे.

इयत्ता १० वी आणि १२ वी सेमिस्टर २ ची परीक्षा दोन तासांची सकाळी १०:30 ते दुपारी १२:३० या वेळेत हाेईल.

विद्यार्थ्यांनी नियुक्त परीक्षा केंद्रांवर सकाळी ९:30 पर्यंत पोहोचायचे आहे. १० वाजता परीक्षा केंद्रात आपल्या जागेवर बसण्याची सूचना देण्यात आली आहे. यानंतर मुलांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश बंद केला जाईल आणि कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत आत प्रवेश दिला जाणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सकाळी १० वाजता वितरीत केल्या जातील जेणेकरुन ते उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरतील आणि प्रश्नपत्रिका देखील पाहू शकतील.

CBSE बोर्डाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्याला २० मिनिटांचा वाचन वेळ दिला जातो.परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करताना CBSE रोल नंबरसह सर्व बाबी सर्टिफिकेट नमूद केलेल्या तपासल्या जातील. यामध्ये संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची तसेच विद्यार्थांची स्वाक्षरी असेल.ज्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर सही नसेल त्या विद्यार्थांना प्रवेश नाकारला जाईल असे सांगण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news