जर आपण एकाच वेळी अनेक कामांची जबाबदारी उचलत असाल, तर आपण एअरपोर्ट ग्राऊंड स्टाफच्या रूपाने करिअर करू शकता.
आपल्याला विमानातून प्रयास करणे आवडत असेल, तर आपण प्रवासाबरोबर करिअरचादेखील विचार करू शकता. हवाई क्षेत्रात एअरपोर्ट प्राऊंड स्टाफ होण्याची संधी मिळू शकते. विमानतळ व्यवस्थापनापासून ते त्याची देखभाल, सुरक्षा राखणे हे ग्राऊंड स्टाफचे काम असते. विमानतळावर विमान उत्तरल्यानंतर प्रवाशांची सुविधा आणि त्यांची जबाबदारी ही ग्राऊंड स्टाफवर असते, याशिवाय विमानतळावरील प्रवाशांच्या सामानाचे वाहन करण्यापासून ते कार्गो स्टॉकचेदेखील काम करावे लागते. ग्राऊंड स्टाफ हा विमानतळावरील वेगवेगळ्या प्रकारची सेवा देत असतो
विमानतळावरील ग्राऊंट स्टाफमध्ये अर्ज करण्यासाठी काही गुण आणि कौशल्य असणे गरजेचे आहे, उमेदवाराकडे चांगले संवाद कौशल्य असणे अनिवार्य असून, तो ऐकून पेण्यास, लिहिण्यास आणि बोलण्यास तरबेज असावा, त्याच्याकडे वेळेच्या अगोदरच काम संपवण्याची हातोटी आणि प्रभावीरीत्या कामाचे नियोजन करण्याची क्षमता असावी लागते. विमानतळावर काम करताना उमेदवाराकडे एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असू शकतात. त्याचे महत्त्व आणि असाय-मेंटच्या आधारावर कामाचा निपटारा करण्याचे कौशल्य अवगत असणे महत्त्वाचे आहे.
उमेदवाराकडे प्रत्येक समस्येचे समाधान असणे अपेक्षित असते. उमेदवार हा टीमबरोबर काम करण्यासाठी सक्षम असावा आणि हो आपल्या कामाप्रति जबाबदार असल्या लागतो, उपलब्ध वेळेत जबाबदारी पार पाडण्यासाठी उमेदवार कुशल असणे अपेक्षित आहे. उदा., हवामान किंवा तांत्रिक कारणामुळे फ्लाईटला विलंब होतो. अशा काळात प्रवाशांची देखभाल करणे आणि त्यांच्या समस्येचे समाधान करण्याची जबाबदारीदेखील ग्राऊंड स्टाफवर असते. अशा काळात त्याला कौशल्य पणाला लावून परिस्थिती हाताळावी लागते.
एअरपोर्ट ग्राऊंड स्टाफचे प्रशिक्षण एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये होते. शॉर्ट टर्म कोर्सेसमध्ये सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ९ महिने आणि एक वर्षाचा डिप्लोमा कोर्स याचा समावेश आहे. यात एअरपोर्ट इंटरशिपचादेखील समावेश असतो, बारावी झाल्यानंतर या अभ्यासक्रमाला सहजपणे प्रवेश घेऊ शकतो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम उमेदवार करू शकतो, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २७ यादरम्यान असावे.
भारतात हवाई क्षेत्राचा विस्तार होत असल्याने रोजगाराच्या संधीदेखील वाढत चालल्या आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील हवाई कंपनी एअर इंडियाशिवाय खासगी क्षेत्रातील हत्याई कंपन्या जसे की, जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईस जेटमारख्या हवाई कंपन्यांत नोकरी मिळण्याच्या विपुल संधी आहेत. त्याचवेळी देशात विमानतळांची संख्यादेखील वाढत चालली आहे. त्यात रोजगाराच्या संधी मिळत आहेत. या ठिकाणी स्वतःची प्रगती करण्यासाठी भरपूर संधी आहेत.
साधारणपणे इंटरनॅशनल एअरलायन्समध्ये एअरपोर्ट ग्राऊंड स्टाफचे वेतन हे डोमेस्टिक एअरलाईन्सच्या स्टाफच्या तुलनेत अनेक पटीने अधिक असते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरुवातीच्या काळात उमेदवार २५ ते ३० हजार रुपये दरमहा वेतन मिळवू शकतो, त्याचवेळी वरिष्ठ पदावर पोहोचल्यानंतर उमेदवाराचे वेतन ५० ते ८० हजारांपर्यंत पोहोचू शकते.
फ्लाईंग क्वीन एअर होस्टेस अॅकॅडमी, नवी दिल्ली एअर होस्टेस अॅकॅडमी, बंगळूर युनिव्वार्सल ऑव्हिएशन अॅकेडमी, चेन्नई विंग्ज फोर एअर होस्टेस अँड हॉस्पिटॅलिटी ट्रेनिंग, बडोदा.