अर्काइव्हल सायन्सची वेगळी वाट | पुढारी

Published on
Updated on

आज जगभरात अनेक शोध लागत आहेत. त्याशिवाय इतिहासकाळातही अनेक गोष्टी घडलेल्या असून त्यासंदर्भातील अनेक कागदपत्रे, माहिती उपलब्ध आहे. ही सर्व माहिती भावी पिढीसाठी सुरिक्षत ठेवण्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. त्यानुसार कार्य करणार्‍यांना आर्किविस्ट म्हणतात. आज या क्षेत्राकडे करिअर म्हणून बघणार्‍यांची संख्या मोठी असून तुम्हालाही ऐतिहासिक गोष्टी, त्याबद्दलची माहिती जतन करण्याची आवड असेल तर यामध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. 

 काय आहे अर्काइव्हल सायन्स? अर्काइव्हल सायन्स हे ऐतिहासिक कागदपत्रे, त्याची माहिती योग्य प्रकारे सुरक्षित ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. यामध्ये एखाद्या देशातील संस्कृती, इतिहासासंबंधी माहिती कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येऊ शकते त्याबद्दलच्या विविध पद्धतींबद्दल शिक्षण दिले जाते. ग्रीकच्या आर्किया या शब्दापासून अर्काइव्ह हा शब्द घेण्यात आला असून पब्लिक ऑफिस, टाऊन हॉल आदी ठिकाणी सरकारची अतिमहत्त्वाची कागदपत्रं ठेवली जातात. उदारणार्थ – सरकारच्या एखाद्या 

महत्त्वाच्या बैठकीत अनेक सदस्य वेग-वेगळ्या प्रकारचे पर्याय देतात अथवा त्यासंबंधी काही महत्त्वाची कागदपत्रे देतात. मात्र, या सर्वच पर्यायांचा अवलंब केला जात नाही. त्यावेळी सदस्यांकडून देण्यात आलेली माहिती अथवा ऐतिहासिक कागदपत्रे हे अर्काइव्हच्या स्वरूपात सुरक्षित ठेवली जातात. अशाप्रकारे महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी विशिष्ट कार्यालयांची निर्मिती करण्याचे सर्वात पहिले काम मध्यपूर्व काळात युरोपीय देशांमध्ये सुरू झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी याची गरज भासू लागली. 

• विस्तृत क्षेत्र – पुरातत्व विभागाला (अर्काइव्ह) तुम्ही विशिष्ट क्षेत्रासाठी मर्यादित ठेऊ शकत नाही. यामध्ये अनेक गोष्टी येतात. जसे की, म्युझियममध्ये ठेवण्यात येणार्‍या ऐतिहासिक कालाकृती आणि वस्तूंचे संरक्षण करण्याचे काम असते. लायब्ररी (वाचनालय) यामध्ये मासिके, पुस्तके, जर्नल आदी प्रकाशित करण्यात आलेल्या गोष्टी सुरक्षित ठेवण्याचे काम केले जाते. तर नॅशनल अर्काइव्हमध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड (इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टी) सुरक्षित ठेवण्याचे काम केले जाते. 

 शैक्षणिक पात्रता-  बहुतांश 
महाविद्यालयात आणि विद्यापीठांमध्ये पुरातत्त्वबद्दल विज्ञानातून अथवा इतिहासाच्या विषयातून माहिती दिली जाते. इतिहास, लायब्ररी सायन्स आदींमधील पदवीधारकदेखील अर्काइव्हल सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा अथवा पोस्ट ग्रॅज्युएशन करून अर्काविस्ट बनू शकतो.  

 व्यक्‍तिगत गुण –  एक उत्तम अर्काइव्हिस्ट बनण्यासाठी तुमच्याकडे इतिहास, विविध क्षेत्रात घडणार्‍या नव-नवीन गोष्टींबद्दल माहिती घेण्याची आवड असणे गरजेचे आहे. याशिवाय विविध पद्धती आणि जगभरात कशा पद्धतीने महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवण्यात आली आहे याबद्दलही माहिती असणे गरजेचे आहे. 

 कुठे आहे नोकरीची संधी? – सध्याच्या घडीला या क्षेत्राला हवे तसे महत्त्व देण्यात आलेले नाही. मात्र, आता याकडे सरकारचे, तसेच विविध संस्थांचे लक्ष केंद्रीत होत आहे. भविष्यात भारतामध्ये या क्षेत्रात शिक्षण घेणार्‍यांना अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये ग्रॅज्युएशन (पदवी) अथवा पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर विविध सरकारी संस्था, म्युझियम, नॅशनल अर्काइव्ह, विश्‍वविद्यालय, ऐतिहासिक स्थळे, ट्रस्ट, फिल्म अर्काइव्ह, प्रमुख रिसर्च करणार्‍या संस्था आदी ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सुरुवातीच्या काळात सरकारी संस्थांमध्ये
काम केल्यास साधारण 30 ते 35 हजारांचे वेतन मिळू शकते. 

 प्रमुख शिक्षण संस्था • नॅशनल अर्काइव्ह ऑफ इंडिया, नवी दिल्ली www.nationalalarchives.inc.in/

• गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद www.gujratvidyapith.ac.in

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news