Career : करिअर निश्चित करताना ‘या’ सहा गोष्टींचा विचार कराच | पुढारी

Career : करिअर निश्चित करताना 'या' सहा गोष्टींचा विचार कराच

संदीप म्हैसकर

स्वत:साठी चांगल्या करिअरची Career निवड करणे हा एक असा निर्णय असतो की त्यातून आपले जीवन बदलू शकते. त्यामुळे करिअर निवडताना आपण स्वत:ला वेळ दिला पाहिजे. योग्य चिंतन, मनन आणि अध्ययन झाल्यानंतरच करिअरबाबत ठोस निर्णय घेणे सोयीचे ठरू शकते.

कोणाला डॉक्टर व्हायचे असते तर कोणाला इंजिनिअर. पूर्वी साचेबद्द करिअर होते. आज असंख्य पर्याय आपल्यासमोर उपलब्ध झाले आहेत. क्रीडा, कला, संगीत या क्षेत्रात नवीन पिढी उत्साहाने वाटा शोधत आहेत. आजकालचे पालक पाल्यांवर करिअरचे Career ओझे टाकत नसून मुलांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची मूभा देताना दिसून येतात आणि त्यासाठी मुलाची मदतही करताना दिसून येतात. आता जबाबदारी मुलांची आहे. करिअरच्या द़ृष्टीने आपला प्रोफाईल कशाला मॅच किंवा सुंसगत आहे, हे पाहणे गरजेचे ठरते. एखादा चुकीचा निर्णय हा करिअरची वाट खडतर करणारा ठरू शकतो. त्यासाठी करिअर निश्चित करताना अगोदर सहा गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे.

कार्यशैलीचे आकलन : आपल्या कार्यशैलीला किंवा कार्यपद्धतीला लागू होईल, अशाच करिअरचा Career विचार करणे कधीही योग्य ठरू शकते. स्वत:लाच काही प्रश्न विचारून अमूक करिअर आपल्याला सूट होईल का किंवा आपण त्यात पुढे जाऊ का याचा विचार करायला हवा. अशा करिअरमध्ये आपण सर्वश्रेष्ठ योगदान देऊ शकतो का किंवा तसेच अनुकूल वातावरण आहे का याचा विचार केला पाहिजे. आपल्याला फिरायची आवड आहे का किंवा एकाच ठिकाणी बसून काम करायला आवडते किंवा लोकात मिळून मिसळून काम करायला आवडते किंवा एकटेच राहणे पसंत असते, या सर्व बाबींची पडताळणी करूनच सुटेबल करिअरचा पर्याय निवडा.

शक्यता पडताळून पाहा : कोणताही निर्णय घेताना आपण आपली क्षमता पाहणे योग्य ठरते. आपल्या पसंतीचे करिअर करताना आपली तेवढी क्षमता आहे का हे समजून घेणे गरजेचे आहे. त्या क्षेत्राचे अध्ययन करून त्यात कोणकोणत्या प्रकारचे कौशल्य किंवा पात्रता गरजेची आहे, याची माहिती करून घ्यायला हवी. जर आपल्याला फुटबॉलमध्ये करिअर करायचे असेल तर आपली शारीरिक क्षमता पूरक आहे का, याबाबत आकलन करून घेणे महत्त्वाचे ठरते. किंवा आयआयटीमध्ये करिअर करण्याचा विचार करणार्‍या विद्यार्थ्यांत अभ्यासाची क्षमता आहे का हेही पाहायला हवे.

आपली आवड आणि प्रतिभा ओळखा : कधी कधी आपली आवड, छंद हा करिअरचा Career विषय ठरू शकतो. जर आपल्याला एखाद्या गोष्टीची आवड आहे किंवा एखाद्या क्षेत्रातील प्रतिभा आपल्याजवळ आहे तर त्यात प्रोफेशनल करिअर करण्याचा गंभीरपणे विचार करायला हवा. जे काम आपण सहजपणे करू शकू त्यात करिअरचा विचार केला पाहिजे. अवजड, बोजड करिअर करण्यापेक्षा किंवा स्पर्धा करण्यासाठी पायावर धोंडा पाडणे टाळले पाहिजे. प्रत्येकाची कुवत, क्षमता ही वेगळी असते याची मनाशी खुणगाठ बांधली पाहिजे.

जसे स्वप्न, तसे करिअर : आपले आर्थिक ध्येय काय आहे, हे सुद्धा करिअर Career निवडीसाठी महत्त्वाची बाब ठरते. जर आपल्याला एखाद्या महानगरात आलिशान घरात राहण्याचे स्वप्न पहात असाल तर लिपिक किंवा नोकरी हे आपले ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगी ठरणार नाही. जर मोठे स्वप्न किंवा लक्ष्य ठेवायचे तर मोठा विचार करावा लागेल आणि कठोर मेहनत घ्यावी लागेल.

सेल्फ असेसमेंट टूल्स : काही सेल्फ असेसमेंट टूल्सचा वापर करून आपण विविध करिअरच्या Career पर्यायातून स्वत:ची यादी तयार करा. जेणेकरून करिअर निवडीची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुटसुटीत होईल. विविध क्षेत्रातील आपली योग्यता पडताण्यासाठी ऑनलाइन जॉब डिस्क्रिप्शन, क्विझ, करिअर इंफॉरमेशन आदींची मदत घेता येऊ शकते.

संयम बाळगा : करिअरची Career निवड करताना संयम असणे खूप गरजेचे आहे. कारण हे करिअर आहे, एखादे इव्हेंट नाही जे की गडबडीत पूर्ण करायचे असते. त्यामुळे घाई न करता आणि गोंधळून न जाता शांतपणे करिअरचा विचार करावा. यासाठी पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक यांचा सल्लाही कधी कधी फायदेशीर ठरू शकतो. नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान ऐकून आपल्या विचारांना बैठक द्यावी. तसेच नामांकित लेखकांची पुस्तकांचे वाचन करून वैचारिक मशागत करावी जेणेकरून आपल्या विचारात प्रगल्भता येईल आणि आपण चौकसपणे निर्णय घेण्यास सज्ज होऊ.

Back to top button