आता शिकविण्याही वळल्या ऑनलाइनकडे | पुढारी

आता शिकविण्याही वळल्या ऑनलाइनकडे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून सर्वात प्रथम शाळा, महाविद्यालये आणि क्लासेस बंद करण्यात आले. मुलांना शिक्षण देण्यासाठी ऑनलाइन पर्याय स्वीकारण्यात आला जो आजदेखील सुरू आहे. पूर्वीसारख्या
शाळा कधी सुरू होतील हे माहिती नाही. यातूनच शाळा जशा ऑनलाइन तसे क्लासेसही ऑनलाइन पर्याय ठेवला आहे.

मिरजेत ॲसिड गोदामात स्फोट; पोलीस अधिकारी ,चार कर्मचारी जखमी

कोरोना कधी संपेल माहिती नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण थांबविता येत नाही. ऑफलाइन शिकविण्याची परवानगी नसल्यामुळे बर्‍याच क्लासेस चालविणार्‍यांनी क्लासेस बंद ठेवले होते. शिक्षण क्षेत्रातील दर्जा व निकाल सुधारण्यासाठी कोचिंग क्लासेसची भूमिका महत्त्वाची आहे. आजकाल बहुतांश पालक हे स्पर्धा परीक्षांसाठी तयारी म्हणून इयत्ता नववी पासून पाल्यास कोचिंग क्लासमध्ये पाठवितात.

संबंधित बातम्या

 दिल्लीत झालेल्या भेटींवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

त्यामुळे कोचिंग क्लासेसला प्रचंड प्रतिसाद मिळतो. कोचिंग क्लासेस चालकांना विद्यार्थ्यांच्या मिळणार्‍या फी मधून क्लासचे भाडे, शिक्षकांचे पगार, शैक्षणिक साहित्य, जाहिराती, टॅक्स भरावे लागतात. मार्च महिना उत्पन्न वाढीचा कालावधी असतो. यामध्येच ऐनवेळीच लॉकडाऊन केल्यामुळे कोचिंग क्लासेस व्यवसाय ठप्प झाले होते. त्यामुळे कोचिंग क्लास चालक आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे हळूहळू क्लासेसने देखील ऑनलाइनकडे मोर्चा वळविला. सध्या फक्त माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑफलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे क्लासेसची मागणी आहेच.

आण्णा हजारे एकदम फिट : डॉक्टरांच्या परवानगीने राळेगणसिद्धीला रवाना

मुळात शाळेत एकदा शिकविले जाते ते सर्वच मुलांना चांगले समजते असे नाही. काही मुले अभ्यासात अप्रगत असतात. त्यामुळे अशा मुलांना क्लासेस लावण्याची गरज पडते. त्यामुळे मुलांवर मेहनत घेणारे क्लासेसचे शिक्षकही तेवढी फी आकारतात. मात्र, 10 वी ते 12 वीच्या मुलांना क्लासेस लावण्याशिवाय पर्याय नसतो. कोरोनामुळे शाळांमध्ये जसा ऑनलाइन आणि ऑफलाइन पर्याय ठेवण्यात आला आहे.तसाच पर्याय क्लासेसनी देखील ठेवला आहे. संसर्गाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी शाळा ऑफलाइन असली तरी वेळ कमी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्लासेसचा आधार घ्यावा लागत आहे. विद्यार्थ्यांची गरज पाहून ऑनलाइन क्लासेसला देखील प्रतिसाद मिळत आहे.

Back to top button