एज्युदिशा : न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई | पुढारी

एज्युदिशा : न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई

प्रा. जॉर्ज क्रूझ

125 पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची अंतिम दिनांक 27-02-2024.

पदे : वैज्ञानिक सहायक (गट क) : पदे 54

पा त्रता : विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसर्‍या वर्गात पदवी उत्तीर्ण किंवा न्यायसहायक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची कमीत कमी दुसर्‍या वर्गात पदवी उत्तीर्ण.
वैज्ञानिक सहायक (संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिफित विश्लेषण (गट क) पदे : 15.

संबंधित बातम्या

पात्रता : विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र किंवा संगणक शास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय श्रेणीतील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणक शाखा किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान किंवा न्याय सहायक विज्ञान या विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण.

वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) गट – क – पदे 2 पात्रता : मानसशास्त्र विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य अर्हता.

वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक – गट क – पदे 30. विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत, प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपिक (भांडार) – गट क – पदे 5, विज्ञान शाखा एचएससी उत्तीर्ण

कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक, गट क पदे – 18 – पात्रता विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण.

व्यवस्थापक (उपहारगृह) गट क – पद 1, पात्रता एसएससी उत्तीर्ण आणि तद्नंतर खानपान क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक तसेच शासन मान्यताप्राप्त कोणत्याही कॅटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतून डिप्लोमा घेतलेल्या उमेदवाराला प्राधान्य.

अभ्यासक्रम : वैज्ञानिक सहायक गट क – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, प्रत्येकी 15 प्रश्न, विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र व न्यायसहायक विज्ञान संबंधित प्रश्न – 40. 100 प्रश्न 200 गुण वेळ 90 मी.

वैज्ञानिक सहायक संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी प्रत्येकी 15 प्रश्न, विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, संगणक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, न्यायसहायक विज्ञान तसेच इ. प्रश्न 40. एकूण प्रश्न 100, गुण 200. वेळ – 90 मि.

वैज्ञानिक सहायक (मानसशास्त्र) – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी प्रत्येकी 15 प्रश्न. मानसशास्त्र विषयातील पदवी यावर प्रश्न – 40.

वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक व वरिष्ठ लिपिक – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान बुद्धिमत्ता चाचणी प्रत्येकी 15 प्रश्न विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण यावर प्रश्न 40.

कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक गट क – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, विज्ञान शाखेतील प्रश्न 40 एकूण 100 प्रश्न.

व्यवस्थापक गट क – मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान बुद्धिमत्ता प्रत्येकी 25 प्रश्न. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. परीक्षाशुल्क खुला 1000, मागासवर्गीय 900, माजी सैनिक शुल्क नाही.

अभ्यासक्रम व संदर्भ सूची

मराठी – मो. रा. वाळंबे, 2) इंग्रजी – बाळासाहेब शिंदे, एम. जे. शेख, 3) बुद्धिमापन – ज्ञानेश्वर वराडे व सामान्यज्ञान – ल्युसेन्ट, Speedy कुवेकर, फॉरान्सिक सायन्स, भौतिकशास्त्र – 11 वी, 12 वी.

मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी यासाठी TES व IBPS चे झालेले पेपर वापरा. अंदाज येत जाईल.

ही जाहिरात www.maharashtra.;gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता.

Back to top button