महाराष्ट्र गट ‘क’ मुख्य परीक्षा तयारी-1

राज्यसेवा परीक्षा
राज्यसेवा परीक्षा

3 एप्रिल 2022 रोजी गट क ची पूर्व परीक्षा झाली. याचा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक पहिला 6 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. उद्योग निरीक्षक गट क ची एकूण (103 पदे) आहेत. त्यामुळे याचे सर्वसाधारण कटऑफ 60 ते 62 च्या दरम्यान अपेक्षित आहे. राज्य उत्पादन शुल्क यांची (114 पदे) आहेत, याचे 58 ते 60 च्या दरम्यान तांत्रिक सहायक विमा संचालनालय एकूण 14 पदे याचे मेरिट 63 ते 65 या दरम्यान तर करसहायकची एकूण पदे 1147 आहेत. याचे मेरिट 50 ते 54 च्या दरम्यान.

लिपिक टंकलेखक (मराठी) एकूण पदे 473 आहेत. त्यामुळे याचे कटऑफ 50 ते 52 च्या दरम्यान, लिपिक टंकलेखक (इंग्रजी) 79 पदे हे सर्व कटऑफ खुल्या प्रवर्गानुसार अंदाजे आहेत. 50 प्लस असणार्‍या सर्व मुलांनी तर 45 प्लस असणार्‍या सर्व मुलींनी मुख्य परीक्षेची तयारी सुरू करावी. वरील सर्व पदांसाठी पेपर पहिला अनिवार्य आहे. पहिला पेपर मराठी 60 गुण व इंग्रजी 40 गुण दर्जा बारावी व पदवीचा असेल.

मराठी ः- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार याचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उतार्‍यावरील प्रश्नांची उत्तरे.
संदर्भ – सुगम मराठी व्याकरण, मो. रा. वाळंबे.
आयोगाचे झालेले स्पष्टीकरणासहीत प्रश्नसंच.

इंग्रजी – spelling, common vocabulary, sentence structure grammar, use of idioms and phrases and their meaning and comprehension of passage.
संदर्भ – इंग्रजी व्याकरण – एम. जे. शेख.
इंग्रजी व्याकरण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण – वेळापुरे सर.
vocabulary साठी – बोडखे.

इंग्रजी व मराठीचा अभ्यास करताना –

सर्वप्रथम आयोगाचे पेपर्स चाळा. प्रत्येक घटक समजून घ्या. नुसतेच वाचू नका. कोणत्या घटकावर प्रश्न अधिक आहेत ते बघा. इंग्रजी व मराठीचा अभ्यास एकत्रित करा. उदा. मराठी शब्दाच्या जाती हा घटक वाचल्यानंतर लगेच इंग्रजीचा parts of speech वाचा. आकलन लगेच होते. अधिक गुण मिळविण्यासाठी अधिक व योग्य सराव करा. संदर्भ म्हणून इतर पुस्तक वाचत असताना ती दर्जेदारच निवडा. आयोग संदर्भ पुस्तके, प्रश्नपत्रिका सेट करून वापरत असते.

मराठी – लीला गोविलकर, श्रीपाद भागवत, जोशी असे संदर्भ चाळा.

इंग्रजीसाठी – pal and Suri, wren and Martin, S. P. Baxi.

सर्व पदाच्या मुख्य परीक्षेची सविस्तर चर्चा व अभ्यासक्रम आपला या मालिकेतून पाहणार आहोत. प्रथम दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पेपर दुसरा, 20 ऑगस्ट 2022 रोजी होणार.

चालू घडामोडी – यासाठी दर रविवारच्या सर्व दैनिकांच्या पुरवण्या.

बुद्धिमत्ता चाचणी – किरण पाटील यांचे बुद्धिमत्ता चाचणी किंवा सानप पठाण अभिनव प्रकाशन. शक्य असेल तर verbal nonverbal R. S. Agerwal.

प्रा. जॉर्ज क्रुझ 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news