काष्ठकलेत करिअर करायचंय? | पुढारी

काष्ठकलेत करिअर करायचंय?

काष्ठ कलेने घरातील पायाभूत गरजा भागवण्याचे काम नेहमीच केले आहे. काष्ठ सौंदर्य आणि सजावटीच्या वैशिष्ट्यांमुळे पॅनल फर्निचर आणि वास्तुकलात्मक डिझाइनमध्ये त्याचा नेहमीच वापर होतो. काष्ठ उत्पादनाने माणसाच्या विविध गरजा नेहमीच पूर्ण केल्या आहेत. जर आपण सभोवताली नजर टाकली तर उपकरणे, खेळण्या, घरे, फर्निचर, पुस्तकं आणि वर्तमानपत्र आदी अनेक वस्तू काष्ठने तयार केल्या जातात. अशा यादीत प्लायवूड पार्टिकल बोर्ड, फायबर बोर्ड, पॅलेटस आणि अनेक अन्य औद्योगिक साहित्याचा देखील समावेश आहे.

घराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नवा स्रोत म्हणून काष्ठ हा एक आकर्षक पर्याय आहे. काष्ठ आणि त्यापासून तयार होणार्‍या विविध उत्पादनांचा उपयोग वाढल्याने काष्ठशी निगडित उद्योगव्यवसाय वेगाने विकसित होत आहेत. अर्थात भारतात जंंगलाचा इतिहास बराच काळ जुना आहे. तरीही काष्ठ उत्पादक हे प्रोसेसिंग आणि उपयोगाच्या क्षेत्रात अन्य देशांशी स्पर्धा करू शकत नसल्याचे दिसून येते.

आजघडीला भारतीय वन्य संशोधन आणि शिक्षण परिषद (आयसीएफआरई), पर्यावरण आणि वन मंत्रालयाशी निगडित काष्ठ तंत्रज्ञान हे संशोधन आणि शिक्षणाचे काम करत आहे. ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न कमी करण्यासाठी वनसंंपदांच्या संरक्षणासंदर्भात काष्ठ तंत्रज्ञानचा विकास करणे गरजेचे झाले आहे.

बीएससी (वन्य) पदवी अभ्यासक्रमात काष्ठ शास्त्र आणि तंत्रज्ञान हा शिकवण्यात येणारा आवश्यक विषय आहे. इंजिनिअरिंग, रसायन विज्ञान किंवा विपणनमध्ये रस ठेवणार्‍या विद्यार्थ्यांसाठी काष्ठ शास्त्र आणि तंत्रज्ञान हे एक आकर्षक करिअर म्हणून ओळखले जाते. हा एक बहुविषयी (मल्टी डिसिप्लिनरी) क्षेत्र आहे. त्याचा संशोधनाबरोबरच थेट भौतिकशास्त्राशीही द़ृढ संबंध आहे.

काष्ठ शास्त्र आणि तंत्रज्ञान हा अभ्यासक्रमात कच्चा माल ते व्यापक ज्ञान आणि माहिती प्रदान केली जाते. काष्ठच्या माहितीत अनाटॉमिकल, भौतिकी, रासायनिक तसेच यांत्रिक मालमत्तेचा समावेश होतो. या विषयातील विद्यार्थी काष्ठ सिझनिंग, काष्ठ परीक्षण, पुनर्निर्मित काष्ठ आधारित पॅनल, वन्य उत्पादन, डिंक, टिंबर इंजिनिअरिंग, काष्ठशी निगडित कामे, रासायनिक संशोधनमध्ये देखील प्रशिक्षण घेऊ शकतात. आपल्या आवडीनुसार विद्यार्थी काष्ठ विज्ञानाशी निगडित अभ्यासक्रमाची निवड करू शकतो आणि ज्ञान मिळवू शकतो. काष्ठ तंंत्रज्ञानाशी निगडित सर्व बाजूंचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.

काष्ठ तंत्रज्ञानात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी विज्ञान, वन्य, कृषी, पायाभूत विज्ञान आदींमध्ये पदवीप्राप्त व्यक्ती अर्ज करू शकतो. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय पातळीवरची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

काष्ठ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (आयडब्ल्यूएसटी) बंगळूर, भारतीय प्लायवूड उद्योग संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आय.पी.आय.आर.पी.टी.आय) बंगळूर, केंद्रीय लगदा आणि कागद संशोधन संस्था (सीपीपीआरआय) या संस्थेतून काष्ठ विज्ञानाचे अध्यापन होतेे. सहारनपूर येथे पीएच.डी. तसेच संशोधन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. नवी दिल्लीतील पूसा येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेशी निगडित कृषी विज्ञान भरती मंडळ (एएसआरबी) यांच्यामार्फत नेट परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेला काष्ठ तंत्रज्ञानातील पदव्युत्तर पदवीधर सहभागी होऊ शकतात. याशिवाय काष्ठ तंत्रज्ञान आणि समवर्गी विज्ञानात विविध अभ्यासिका देखील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, संस्थेत चालवले जाते.

आजघडीला या क्षेत्रात मोठी मागणी आहे आणि ही मागणी भविष्यातही वाढण्याची शक्यता आहे. काष्ठ तंत्रज्ञान शिक्षण क्षेत्रात करिअर करण्यासाठी नॅनोटेक्नॉलॉजी, भौतिक विज्ञान आणि काष्ठ इंजिनिअरिंग क्षेत्रात प्राविण्य मिळवणे गरजेचे आहे. काष्ठ विज्ञानात कौशल्य मिळविण्यासाठी भारत आणि भारताबाहेरही कोणत्याही नामांकित विद्यापीठ, शैक्षणिक संस्थेतून पीएच.डी. आणि संशोधन कार्यक्रमासाठी अर्ज करता येऊ शकतो.

नेट प्रमाणपत्राबरोबरच मास्टर पदवीधारक तज्ज्ञ या क्षेत्रात बहारदार करिअर करू शकतात. शास्त्रज्ञ आणि संशोधन अधिकारी रुपातून देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आणि संस्थेत काम करता येते. वन्य स्रोत संशोधन आणि संरक्षण यातही करियरची चांगली संधी आहे. काष्ठ कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मिळणारे वेतन हे अन्य देशातील इंजिनिअरप्रमाणे आहेे. काष्ठ तंत्रज्ञानातील पदवीधारक विद्यार्थी हा विविध परीक्षेच्या माध्यमातून, भरती मंडळातून केंद्र सरकार, राज्य सरकार, वनविभागात शास्त्रज्ञ, हस्तशिल्प विकास अधिकारी, गुणवत्ता निरीक्षक अधिकारी पदावर नेमले जातात.

जयदीप नार्वेकर 

Back to top button