MPSC : महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा

MPSC : महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा
Published on
Updated on

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या विविध स्पर्धा परीक्षांपैकी महाराष्ट्र गट 'क' सेवा परीक्षा  (MPSC Group C Exam) ही एक महत्त्वाची परीक्षा. ही परीक्षा (MPSC Group C Exam) देण्यासाठी उमेदवाराकडे नेमकी कोणती अर्हता तसेच परीक्षा पद्धत याविषयी या लेखातून माहिती मिळवू. प्रस्तुत परीक्षेमार्फत एकूण पाच पदे भरण्यात येतात. ज्यामध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक व लिपिक टंकलेखक.

अर्हता :

1) वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान व कमाल वय या सीमा रेषेत गणले जाते. हे वय प्रवर्गनिहाय भिन्न असते. याव्यतिरिक्त कमाल वयोमर्यादेमध्ये दिव्यांग उमेदवारांसाठी वयाची 45 वर्षे इतकी सूट असते.

2) शिक्षण : उद्योग निरीक्षक – स्थापत्य/स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न वास्तुविद्या, नगररचना इ. विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी.

इतर पदांसाठी – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार हे पूर्व परीक्षेस पात्र असतील. मात्र, मुख्य परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

3) विशिष्ट अर्हता : अ) दुय्यम निरीक्षक

पुरुष उमेदवार – उंची – किमान 165 सें.मी. (अनवाणी), छाती – किमान 79 सें.मी. फुगवून जास्तीचा 5 सें.मी. फरक.
महिला उमेदवार – उंची – किमान 155 सें.मी. (अनवाणी), वजन – किमान 50 कि.ग्रॅ.

ब) कर सहायक व लिपिक टंकलेखक

या पदांसाठी – मराठी 30 व इंग्रजी 40 अशाप्रमाणे टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे.

परीक्षेच्या संधी – आयोगाने केलेल्या बदलानुसार उमेदवारास आता परीक्षेच्या कमाल संधीची अट बंधनकारक आहे. ज्यामध्ये अराखीव खुला प्रवर्गासाठी कमाल संधीची मर्यादा ही 6, तर उर्वरित मागासवर्गासाठी 9; मात्र एससी व एसटी प्रवर्गासाठी ही अट लागू होत नाही.

परीक्षेचे टप्पे –

1) पूर्व परीक्षा – प्रस्तुत सर्व पदांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते. यासाठी उमेदवारांना आपण कोणत्या पदासाठी इच्छुक आहोत यासंबंधी विकल्प द्यावे लागतात. पूर्व परीक्षा 100 गुण, 100 प्रश्न व 1 तास वेळ या स्वरूपात असते. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामुळे 25 टक्के नकारात्मक गुण पद्धत असते. सर्व पदांसाठी स्वतंत्र निकाल जाहीर होतो.

2) मुख्य परीक्षा – एकूण 200 गुणांची संयुक्त पेपर क्र. 1 व स्वतंत्र पेपर क्र. 2 अशाप्रकारे प्रत्येकी 100 गुणांचे दोन पेपर असतात. दोन्ही पेपरचे गुण एकत्र करून अंतिम निकाल लावण्यात येतो. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत.

सुजित गोळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news