एमएफसी फायनान्स… एक नवे करिअर | पुढारी

एमएफसी फायनान्स... एक नवे करिअर

बँका, फायनान्स सेक्टर, देश-विदेशी कंपन्या यामध्ये एमएफसी (मास्टर ऑफ फायनान्स) हे करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करणारं एक नवं क्षितिज म्हणून पुढं आलं आहे. फायनान्समध्ये नवीन तज्ज्ञ तयार करण्याच्या उद्देशाने या कोर्सबरोबरच आता मास्टर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्ससाठीही प्रवेश परीक्षा घेण्यात येतात.

फायनान्स क्षेत्रातला मास्टर

हा कोर्स पूर्ण वेळ दोन वर्षांचा असतो. वित्तीय क्षेत्राशी निगडीत असलेल्या अनेक विभागांविषयी त्यात माहिती दिली जाते. करिअर करणार्‍या विद्यार्थ्यांना मॅनेजेरिअल धोरणाशी निगडित असलेली क्षेत्रे (उदा. ऑर्गनायझेशन बिहेविअर, मॅनेजेरियल इकॉनॉमिक्स, कॉन्टिटेटिव्ह टेक्निक, फायनान्स अकाऊंटिंग आणि कॉर्पोरेट लॉ) या संबंधित अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याशिवाय फायनान्सशी निगडित क्षेत्रे (उदा. फायनान्शियल मॅनेजमेंट, फायनान्शियल सर्व्हिसेस, इंटरनॅशनल फायनान्स आणि इंटरनॅशनल अकाऊंटिंग, इन्व्हेस्ट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट अप्रायजल) (मूल्यमापन) यासंबंधी माहिती दिली जाते.

प्रॅक्टिकल प्रशिक्षण

नव्याने सुरू केलेल्या कोर्समध्ये डेरिव्हेटिव्हज आणि रिस्क मॅनेजमेंट, ट्रेजरी मॅनेजमेंट, रिअल इस्टेट मॅनेजमेंट, इन्शुरन्स मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड, इक्वीटी रिसर्च या संबंधीचाही अभ्यासक्रम घेतला जातो. कोर्सबरोबरच यामध्ये 8 ते 10 आठवड्यांसाठी प्रॅक्टिकल प्रशिक्षण दिले जाते. काही नामांकित संस्थांमध्ये समर ट्रेनिंग म्हणूनही दिले जाते. उद्योग क्षेत्राशी प्रोजेक्ट वर्क म्हणूनही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे व्यावहारिक ज्ञान येते. कोर्सदरम्यान विद्यार्थी वार्षिक कन्वेन्शन, कार्यशाळा, वर्कशॉप, रिसर्च यासारख्या अ‍ॅक्टिव्हिटी करत असतात.

परीक्षा कशी होते?

या कोर्सच्या विद्यार्थ्यांना तीन वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागते. त्यामध्ये लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन (गटचर्चा) आणि मुलाखत. लेखी परीक्षा वस्तूनिष्ठ प्रश्नांवर आधारित असते. यामध्ये अनेक पर्यायी उत्तरांमधून बरोबर उत्तर शोधणे आवश्यक असते. त्यामध्ये दोनशे प्रश्नांचे वेगवेगळे चार भाग केले जातात. कॉन्टिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड, इंग्रजी भाषा, डाटा इंटरप्रिटेशन (भाषांतर) रिजनिंग आणि करन्ट बिझनेसबरोबर अर्थशास्त्र.

निवड कशी होते?

एमबीएच्या प्रवेश परीक्षेसाठी जे प्रश्न असतात, तसेेच एमएफसीच्या प्रवेश परीक्षेच्या प्रश्नांचेही स्वरूप असते. त्यामध्ये करन्ट बिझनेस आणि अर्थशास्त्रावर अधिक भर देणे गरजेचे आहे. उत्तरपत्रिका सोडविण्याचे स्पीड अधिक असावे. हा फायनान्सशी निगडित कोर्स असल्यामुळे त्या संबंधीचेही काही प्रश्न विचारले जातात. इंग्रजीमध्ये व्याकरण आणि शब्दांची माहिती यासंबंधीचे प्रश्न असतात.

संधी कुठे कुठे मिळेल?

विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंटमध्ये कॉर्पोरेट फायनान्स, मर्चंट बँकिंग, कॅपिटल आणि मनी मार्केट, बँक, विमा कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या यामध्ये संधी मिळू शकते. या कोर्समध्ये प्रवेश मिळाल्यास कॉम्प्युटर लॅब, होस्टेल आणि लायब्ररी यासारख्या सुविधांचा लाभ घेता येतो.

सत्यजित दुर्वेकर 

Back to top button