

Cyber crime helpline Number
देशभरात सायबर फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकांच्या बँक खात्यांमधून लाखो रुपयांची फसवणूक विविध माध्यमातून केली जात आहे. अशा वेळी भारत सरकारने सुरु केलेला '१९३०' हा राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर फसवणूक झालेल्या व्यक्तींकरिता अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
'१९३०' हा टोल-फ्री हेल्पलाइन नंबर गृह मंत्रालयाच्या सायबर क्राइम विभागाने सुरू केला असून, याचा उपयोग सायबर फसवणूक झाल्यानंतर तात्काळ मदतीसाठी केला जातो. या नंबरवर फोन करून तक्रार केल्यास, संबंधित यंत्रणा त्वरित कार्यवाही करतात. फसवणुकीत गेलेले पैसे परत मिळवण्याची शक्यता वाढते.
केंद्र सरकारने १९३० हा हेल्पलाइन नंबर सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी जारी केला आहे. या नंबरवर कॉल करून नागरिक त्यांच्या सोबत झालेल्या सायबर फसवणुकीची तक्रार नोंदवू शकतात. हा नंबर संपूर्ण देशभर वैध आहे आणि सर्व राज्य सरकारे देखील या माध्यमातून नागरिकांना मदत पुरवत आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, देशात सायबर फसवणुकीचे प्रकार झपाट्याने वाढत आहेत. म्हणूनच हा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव करून ठेवणं खूप गरजेचं आहे.
१९३० हा नंबर तेव्हा डायल केला जातो, जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत आर्थिक फसवणूक होते. उदाहरणार्थ, जर कोणाच्या बँक खात्यातून अचानक पैसे काढले गेले असतील, व्हिडिओ कॉलद्वारे 'डिजिटल अरेस्ट' सांगून फसवणूक केली गेली असेल, किंवा OTP मागून एखाद्याची आर्थिक फसवणूक झाली असेल, तर अशा सर्व प्रकरणांमध्ये १९३० नंबरवर तात्काळ कॉल करून तक्रार नोंदवता येते. या नंबरवर कॉल केल्यावर काही मूलभूत माहिती द्यावी लागते, जसे की:
आपले पूर्ण नाव
मोबाईल नंबर
पत्ता
फसवणुकीसंबंधी संपूर्ण माहिती – घटना कधी घडली, किती रक्कम गेली, कोणत्या पद्धतीने फसवणूक
१९३० नंबरवर कॉल करा आणि घटनेची सविस्तर माहिती द्या.
www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा.
शक्य असल्यास स्क्रीनशॉट, व्यवहाराचा तपशील आणि वेळ लक्षात ठेवा.
मोबाईलमध्ये ‘Cyber Helpline 1930’ म्हणून सेव करा
अशा घटनांमध्ये वेळेवर केलेली तक्रार हेच मुख्य शस्त्र असते. त्यामुळे हा नंबर मोबाईलमध्ये सेव करून ठेवा.