ठाणे : दुर्मीळ पिसोरी हरणाची हत्या; एकाला अटक | Chevrotain

अंबरनाथ एमआयडीसी परिसर जंगलात बंदुकीच्या गोळीने शिकारीचा प्रयत्न
अंबरनाथ एमआयडीसी परिसर
ठाणे : आरोपी जगदीश वाघ याला शनिवारी बदलापूर वन परिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे आणि वनपाल वैभव वालिंबे यांच्या टीमने ताब्यात घेतले.Pudhari news network
Published on
Updated on

ठाणे : जंगलातील वन्य प्राण्यांची हत्या करण्यासाठी प्रतिबंध असताना देखील दुर्मिळ प्राण्यांना मारण्याच्या घटना घडत असून, अंबरनाथ एमआयडीसी परिसरात बंदुकीने दुर्मिळ अशा पिसोरा जातीच्या हरणाची शिकार केल्याप्रकरणी एकाला बदलापूर वन विभागाने अटक केली आहे.

अंबरनाथ एमआयडीसी परिसर
पिसोरा जातीचे हरणPudhari news network

जगदीश वाघ (25) रा. अंबरनाथ असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसी परिसरात गेल्या महिन्यात एक पीसोरा जातीचे हरण जखमी अवस्थेत आढळून आले. बदलापूर वनविभागाने तत्काळ जखमी हरणाला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या हरणाला बंदुकीची गोळी लागून ते जखमी अवस्थेत जंगलातील उंच उतारावरून खालू पडले असल्याचे निदान झाले. शिकारीच्या उद्देशाने त्याला बंदुकी गोळी मारल्याचे उघड झाले. या संदर्भात गुन्हा नोंद झाल्यावर उपवनसंरक्षक सचिन रेपाल आणि सहाय्यक वनसंरक्षक गणेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून, मिळालेल्या माहिती आधारे जगदीश वाघ याला शनिवारी बदलापूर वन परिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे आणि वनपाल वैभव वालिंबे यांच्या टीमने ताब्यात घेतले.

अंबरनाथ एमआयडीसी परिसर
रायगड : माणगावात आढळले दुर्मीळ पिसोरी हरीण | Chevrotain

वन्यजीव अधीनियमानुसार जंगलात कोणत्याही वन्य जीवाची शिकार करण्यासाठी सक्त मनाई आहे. जर कोणी असे आढळून आल्यास त्यावर वन विभागाच्या वन कायद्यानुसार कडक कारवाईचे निर्देश दिले असून, जगदीश वाघ याची चौकशी केली असता, त्याच्या मोबाईल मध्ये वन्यप्रणीची शिकार करतानाचे फोटो मिळाले आहेत. या सोबतच त्याने इतर प्राण्याची शिकार केल्याचे फोटो ही वन विभागाला सापडले आहेत. जगदीश याच्या सोबत आणखी दोघे जण असून त्यांचा शोध वन विभाग करत आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलिस कस्टडी दिली आहे.

दुर्मीळ पिसोरी हरणाच्या हत्येने हळहळ

पिसोरा हरण मोठ्या जंगलात सापडत असून आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत आढळतात. आपल्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात देखील या हरणांचे अस्तित्व आहे. हरीणांच्या जातींमध्ये सर्वात लहान असते. पिसोरीचे डोके लहान असते, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात, त्यामुळे याला माउस डियर असेही म्हणतात.दुर्मिळ पिसोरी हरणाच्या हत्येने हळहळ व्यक्त होतेय.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news