Thane Crime | बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे मोबाईल चोरी करणार्‍या टोळीला अटक

आरोपींकडून 13 मोबाईल व एक चारचाकी वाहन जप्त
Crime News
बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे गर्दीतून मोबाईल पळविलेPudhari News network
Published on
Updated on

मिरा रोड : काशीमीरा परीसरात व इतर ठिकाणी बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांची अडवणुक करून त्यांच्याकडील मोबाईल चोरी करणार्‍या टोळीला काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. अटक आरोपींकडून 13 मोबाईल व एक चारचाकी वाहन जप्त केले आहे.

Summary

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिण्यापासून बसमधील प्रवाशांचे मोबाईल फोन जबरी चोरी करून चोरून नेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मोबाईल चोरांची टोळी दररोज बसमध्ये चढणार्‍या प्रवाशांचे मोबाईल चोरत होते. अनेक लोक तक्रार करतात तर काही जण तक्रार देखील करत नाहीत. मोबाईल चोरीच्या घटनांची वरिष्ठांनी गांभिर्याने दखल घेवून आरोपीचा शोध घेवुन त्यास पायबंद करणे बाबत सुचना दिल्या होत्या.

काशिमिरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयाचे अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, सहा. पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे काशिमिरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार असे पोलीस ठाणे हददीत गुन्हयाचे अनुषंगाने तपास करत असताना एका कार मध्ये बसलेले 6 इसमांच्या हालचाली संशयास्पदरित्या दिसल्या. त्यांना ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एकूण 12 मोबाईल फोन मिळून आले. मिळून आलेल्या मोबाईल फोनची पडताळणी करता त्यापैकी एक मोबाईल हा दाखल असलेल्या गुन्हयातील चोरीस गेलेला असल्याचे आढळून आले. या गुन्ह्यात इसमांचा सहभाग निष्पन्न झाल्याने 6 इसम अन्वर गफुर सय्यद, समीर बशीर अन्सारी ऊर्फ बचकाना, मोहम्मद अफजल मोहम्मद वजीर शेख, सलीम अब्दुल रहमान शेख, अफरोज अहमद शेख, मोहम्मद सुलतान अब्दुल कय्युम खान ऊर्फ लाला हे सर्व रा. मुंब्रा त्यांचे ताब्यात 12 मोबाईल फोन व एक चारचाकी वाहन मिळून आले. एकूण 3,01,500 रूपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान काशिमिरा पोलीस ठाणे 3 गुन्हे, दहिसर पोलीस ठाणे, मुंबई 2 गुन्हे व एक कासारवडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर असे सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्हयाचा पुढील तपास सपोनि योगेश काळे हे करत आहेत.

Crime News
ठाणे : दोन सराईत मोबाईल चोरट्यांना अटक; ७ लाखांचे मोबाईल हस्तगत

आरोपी हे चारचाकी कार भाडयाने घेऊन चोरी करण्यासाठी येत होते. मोबाईल चोरी करताना प्रवाशी बस मध्ये चढताना त्याच्या पुढे एक मागे एक जण व मोबाइल चोरणारा एक असे बसमध्ये चढत होते. मोबाईल चोरी केला की पुढच्या बस स्टॉपवर उतरत होते. मोबाईल चोरताना बघितले तर लगेच मोबाईल चोरणारा पळून जात होता. बसमध्ये असलेले दोघे मोबाईल चोरून पळाला असे ओरडत त्याच्या मागे पळत होते. त्यामुळे मोबाईल चोर पकडला जात नव्हता. त्यानंतर लगेच गाडीत बसुन पळून जात होते.

बस स्टॉपवर आरोपींचे पोस्टर

काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत दररोज बस मध्ये चढणार्‍या प्रवाशांचे मोबाईल फोन चोरी होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी बस स्टॉपवर आरोपीचे फोटो असलेले पोस्टर लावले आहेत, तसेच बसचालक असलेल्या व्हॉट्स प ग्रुपवर आरोपींचे पोस्टर पाठवले आहेत. या पोस्टर वर संपर्क क्रमांक दिलेले असुन हे आरोपी दिसले तर पोलिस ठाण्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच आरोपीवर पाळत ठेवण्यासाठी सकाळी संध्याकाळी गर्दीच्या वेळेस बिट अंमलदार पाळत ठेवत आहेत. यापूर्वी देखील 13 मोबाइल चोरी करणार्‍या आरोपींना पकडण्यात आले आहे. आता पुन्हा नविन सहा आरोपीला पकडले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news