Raigad Crime | धक्कादायक ! महिलेला भररस्त्यात शारीरिक अत्याचाराची धमकी

मांडवा सागरी पोलिसांकडून परहूर येथील आरोपीला तात्काळ अटक
मांडवा सागरी पोलीस ठाणे
Mandwa Maritime Police Station
मांडवा सागरी पोलीस ठाणेPudhari News Network
Published on
Updated on

चोंढी (रायगड) : अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किहीम येथे चालत जाणार्‍या महिलेला भररस्त्यात शारीरिक अत्याचारी धमकी देण्याचा प्रकार समोर आला आला आहे. या महिलेने मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

याबाबत मांडवा सागरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 16 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास किहीम आरसीएफ कॉलनी समोरून जात असताना आरोपी आपल्या दुचाकी मोटार सायकलवरून येऊन रस्ता अडवत महिलेला माझ्या सोबत शारीरिक संबंध ठेव, असे बोलून फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न केली अन्यथा ठार मारेन अशी धमकी दिली. यावर महिलेने आरोपीला विरोध केला. तेव्हा आरोपीने तिथून आपल्या दुचाकी वरून पळ काढला. यानंतर फिर्यादी महिलेने 16 जून रोजी दुपारी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात जाऊन झालेल्या घटनेची माहिती दिली असता आरोपीवर गुन्हा दाखल केला.

मांडवा सागरी पोलीस ठाणे
Mandwa Maritime Police Station
Raigad Drug News | रायगडमध्ये तीन वर्षांत 400 कोटींचे अमली पदार्थ जप्त

या गुन्ह्याचा महिला पो.ह.वा. ए. व्ही. करावडे यांनी पुढील तपास करीत आहेत. परहुरपाडा येथील आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळत त्याला अटक केली व गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासाच्या आत गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र तयार करून दोषपत्रासोबत आरोपी यास न्यायालयात हजर करून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवले आहे.

मांडवा सागरी पोलीस ठाणे
Mandwa Maritime Police Station
मांडवा येथून १ लाख ८१ हजार रुपयांचा गांजा जप्त

मांडवा पोलिसांकडून जलद तपास

यापूर्वीही गेल्या मार्च महिन्यात मांडवा पोलिसांनी कनकेश्वर देवस्थान येथे अशाच प्रकारच्या घडलेल्या महिलेच्या विनयभंग प्रकरणाच्या घटनेत आरोपी विरुद्ध कडक कारवाई करत 24 तासाच्या आत गुन्हा दाखल करून मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करत आरोपीला शिक्षा सुनावली होती, याबद्दल मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भोई व त्यांच्या सहकार्‍यांचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात विशेष कौतुक केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news