

नेरळ (ठाणे) : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील शेलू येथे प्रेमसंबध असलेल्या प्रियकराने त्याच्याच गर्लफ्रेंडच्या अल्पवयीन असलेल्या 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या लिंगपिसाट प्रियकरा विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देताच, नेरळ पोलीसांनी त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून नराधम प्रियकराला ताब्यात घेतले आहे.
मौजे शेलू येथील एका सोसायटी मध्ये राहाणारी 32 वर्षाय महिला हिचे जितेंद्र सुखदेव चोपडे या इसमाबरोबर प्रेम संबध होते. ती महिला व तिचे पहिल्या नवर्यापासून असलेल्या दोन मुलांसह प्रेमसंबध असलेल्या इसमा सोबत गेली तीन वर्ष लिव-इन रिलेशनशिप प्रमाणे एकत्र राहात होती, मात्र सदर इसम हा तीच्या 8 वर्षीय असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत होता.
ही बाब महिलेच्या लक्षात येताच आपल्या पिडित मुलीला घेऊन, सदर इसमा विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पिडित अल्पवयीन मुलीला नेरळ पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरिक्षक प्राची पांगे यानी विचारपूस केली असता, सदर पिडित मुलीने तिचा बाप हा रात्रीचे झोपेत तिला स्वःकडे ओढून घेऊन तिच्या प्रायव्हेट जागी हात घालतो व चुकीचे कृत्य करतो अशी हकीगत सांगितली असता, क्षणाचा विलंब न करता लिंगपिसाट प्रियकराला नेरळ पोलीसांनी ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता, दारूचे नशेत दोन वेळा पीडित अल्पवयीन मुली सोबत असे कृत्य केल्याचे कबुली दिली. सदर लिंग पिसाट प्रियकरा विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हा भास्कर गच्चे करीत आहेत.