

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिक येथील काठे गल्लीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर दगडफेक झाली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली आहे.
नाशिकच्या काठे गल्लीत परिसरातील अनधिकृत दर्गा काढण्याचे काम मंगळवार (दि.15) रोजी मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आले. मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्तपणे मध्यरात्रीच्या सुमारास कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या कारवाईबाबतीत चर्चा सुरू झाल्यानंतर संतप्त जमाव काठे गल्लीच्या दिशेने चालत आला होता. या जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस वाहनांच्या दिशेने अचानक दगडफेक सुरू केली यामध्ये पोलीस पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरु असून पोलीस आयुक्त, आमदार देवयानी फरांदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची चौकशी केली आहे.