Nashik Nandurnaka Murder Case : सुनील दहिया, सुमित हंडोरे अद्यापही फरार
नाशिक : राहुल धोत्रे खुन प्रकरणातील मुख्य संशयित सुनील दहिया व सुमित हंडोरे अद्यापही फरार असून अटक करण्यात आलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे यांची पोलिस कोठडी २० सप्टेबर रोजी संपत आहे. त्यामुळे पोलिस अजूनही मुख्य मारेकर्यांपर्यंत कधी पोहचणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
२३ ऑगस्ट रोजी नांदूर नाका येथे दोन गटांमध्ये किरकोळ भांडणाचे रूपांतर गंभीर हाणामारी झाले. यात राहुल धोत्रे या तरुणाचा खून झाला. भांडण सुरू असताना उद्धव निमसे व त्यांचे कार्यकर्ते तेथे दाखल झाले.
धोत्रे यास मारहाण करतानाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित सुनील दहिया व सुमित हंडोरे हे दोघे स्पष्ट दिसत आहेत. मात्र, २३ ऑगस्ट पासून हे दोघेही फरार आहेत. २९ ऑगस्ट रोजी राहुल धोत्रेचा खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. दरम्यानच्या न्यायालयाने देखील याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्याकडे तपास दिल्यानंतर तपासास गती मिळाली व निमसे पोलिसांच्या स्वाधीन झाले. आता मुख्य मारेकऱ्यांना अटक करण्याचे मोठे अव्हाण पोलिसांसमोर असणार आहे.

