

सिन्नर (विंचुरी-दळवी, नाशिक) : विंचुरी-दळवी येथील खून प्रकरणातील फरार आरोपीला सिन्नर पोलिसांनी सापुतारा सीमेवरून अटक केली आहे. गु.र. नं. 687/25, कलम BNS 103 अंतर्गत दाखल असलेल्या या खून प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रेम शंकर पवार उर्फ प्रेम बाळू पाईकराव (वय 19) असे नाव आहे.
पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, आप्पासाहेब काकड आणि अमोल शिंदे यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई पार पाडली. आरोपी गुजरात राज्यात पलायन करत असताना शनिवारी (दि.8) रोजी पहाटे साडेतीन वाजता सापुतारा बॉर्डरवर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.