विंचुरी दळवी (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी गावात भैरवनाथ मंदिराजवळ एका 50 वर्षीय पुरुषाचा निर्घूण खून झाल्याची घटना घडली आहे ( छाया : विकास दळवी)
नाशिक
Nashik Murder News : विंचुरी दळवी येथे भैरवनाथ मंदिराजवळ निर्घूण खून
धारदार हत्याराने वार करुन 50 वर्षीय इसमाचा खून
विंचुरी दळवी (नाशिक) : सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी गावात भैरवनाथ मंदिराजवळ एका 50 वर्षीय पुरुषाचा निर्घूण खून झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवार (दि.4) रोजी मध्यरात्री बारा ते एकच्या दरम्यान घडली असून, अज्ञात व्यक्तीने मयताच्या चेहऱ्यावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे वृत समोर आले आहे.
मयत व्यक्तीचे नाव विलास आबाजी दळवी (उर्फ बजरंग, वय 50) असे आहे. घटनेची माहिती मिळताच सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

