Nashik Murder Case, Uddhav Nimse : अखेर उद्धव निमसे अखेर पोलिसांना शरण

उद्धव निमसे यांनी गुंडविरोधी पथकाकडे शरणागती पत्करली
नाशिक
फरार माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी अखेर सोमवारी (दि.१५) सायंकाळी गुंडविरोधी पथकाकडे शरणागती पत्करली.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा व हायकोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर खून खटल्यातील फरार माजी नगरसेवक उद्धव निमसे यांनी अखेर सोमवारी (दि.१५) सायंकाळी गुंडविरोधी पथकाकडे शरणागती पत्करली. न्यायालयाने कानउघडणी केल्यानंतर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी पथके रवाना केली होती, मात्र त्यात यश आले नाही.

नाशिक
Nashik Nandur Naka Crime | टोळीयुद्धाला रक्तरंजित वळण : नांदूर नाक्यावरील हल्ल्यात जखमी युवकाचा मृत्यू

बहुचर्चित राहुल धोत्रे हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी माजी नगरसेवक उद्धव निमसे पोलिसांसमोर स्वतःहून हजर झाले. न्यायालयाने पोलिसांची कानउघडणी केल्यानंतर तपास यंत्रणा जोमाने कामाला लागली होती, पण निमसे यांनी स्वतः हजर राहणे ही बाब आश्चर्यकारक मानली जात आहे. आता सर्व सुटकेचे मार्ग संपल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा सुरू आहे. या प्रकरणात नाशिकमध्ये मनसे व शिवसेना (उबाठा) गटाने धोत्रे यांचे पोस्टर हातात घेऊन मोठ्या प्रमाणावर घोषणा देत जनआक्रोश मोर्चा काढला होता. तर नातेवाईकांनी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचेही दिसत होते. या सर्व परिस्थितीमुळेच निमसे पोलिसांना शरण आल्याचे बोलले जात आहे.

नाशिक
Nashik Nandurnaka Murder Update : 22 दिवसानंतरही उद्धव निमसे फरारच

...तर जामीन मंजूर झाला असता

धोत्रे हल्ला प्रकरणी प्रथम निमसे व त्यांच्या साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी अंतरिम जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र ज्या दिवशी या अर्जावर निकाल लागणार होता, त्याच दिवशी धोत्रे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जामीन फेटाळण्यात आला. कदाचित त्या वेळी धोत्रे जिवंत असते, तर जामीन मंजूर झाला असता, अशी चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news