

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क | नाशिकच्या दिंडोरी रोड वरील बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार आणि दगडफेक करण्यात आला आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार आणि दगडफेक करून तिथून पळ काढलेला आहे.
व्यावसायिकाच्या घरासमोरील चार चाकी वाहनाची सुद्धा तोडफोड केली आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. तर या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवार (दि.7) पहाटे 4:30 वाजता गोळीबार केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञातांनी घरावर गोळीबार करून पळ काढला असून या हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.