

मालेगाव (नाशिक) : जुना आग्रा रोडवरील नानावटी पेट्रोल पंपाजवळ एका तरुणाची तिघांनी धारदार शस्त्राने व दगडाने ठेसून हत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि.25 जुलै) घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघा संशयितांना न्यायालयात हजर केले असता एका संशयिताला 6 ऑगस्टपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर दोघा विधीसंघर्षित बालकांची नाशिक येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
शुक्रवारी (दि. १) नितीन अर्जुन निकम (25, रा. जयभीमनगर, आयेशानगर) याचा खून झाला. याप्रकरणी मृताचा भाऊ अर्जुन निकम याच्या फिर्यादीवरून छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित सचिन अहिरे उर्फ सच्या माया याच्यासह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित सचिन अहिरेला 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर दोघा विधीसंघर्षित बालकांची नाशिक येथील बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.