Money Rain Racket
Money Rain Racket : पैशांच्या पावसासाठी जादूटोणा करणारे त्रिकुट गजाआडFile Photo

Jalgaon Crime : बंद असलेल्या कंपन्यांमध्ये चोरी करणारे आरोपी गजाआड

मुद्देमालासह चार तासात एमआयडीसी पोलिसांची कारवाई
Published on

जळगाव : एमआयडीसी परिसरातील ‘व्ही सेक्टर’मधील बंद असलेल्या कंपन्यांमधून 48 हजार 600 रुपये किमतीच्या साहित्याची चोरी करणाऱ्या आरोपीस चार तासांत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. चोरीसाठी वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील व्ही सेक्टरमधील बंद असलेल्या V-15 कंपनीतून आणि V-130 गौरी पॉलीमर्स या कंपनीतून चटई बनविण्याच्या मशीनचे नवे-जुने स्पेअर पार्ट्स, तांब्याच्या तारेचे वायर रिल, इलेक्ट्रिक वायरची बंडले असे मिळून एकूण 48,600 रुपयांचे साहित्य चोरीस गेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

Money Rain Racket
Jalgaon Crime, Raid on Gambling : हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये सुरु होता 'झन्ना मन्ना'...

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरु केला. घटनास्थळ तसेच नेत्रम कार्यालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.

फुटेजमध्ये दोन महिला बंद कंपनीच्या आवारात जाऊन साहित्य गोणीत भरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ते गोण्यांमध्ये भरलेले साहित्य एका रिक्षामधून नेत असल्याचेही फुटेजमध्ये स्पष्ट झाले. रिक्षा क्रमांकाच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचले.

Money Rain Racket
जळगाव : वॅट, ड्युटी वाढीविरोधात बिअर बार मालकांचा मूक मोर्चा

चार तासांत आरोपी जेरबंद

इमरान खान सलीम खान भीस्ती उर्फ रेपट्या (रा. शाहूनगर, जळगाव) याच्याकडून एकूण 48,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये 18,000 रुपये किमतीचे तांब्याच्या तारेचे वायर रिल, 5,600 रुपये किमतीचे 'पॉलीकेब' ब्रँडचे इलेक्ट्रिक वायरचे 7 बंडल आणि सुमारे 25,000 रुपये किमतीचे चटई मशीनचे स्पेअर पार्ट्स यांचा समावेश आहे.

या कारवाईमध्ये पोहेकॉ. गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे, नितीन ठाकूर, पोकॉ. पंकज खडसे, मुबारक देशमुख यांचा सहभाग होता. पुढील तपास पोहेकॉ. रामकृष्ण पाटील व पोकॉ. नरेंद्र मोरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news