Jalgaon Crime, Raid on Gambling : हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये सुरु होता 'झन्ना मन्ना'...

जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा : 19.97 लाख रुपयांची रोकड जप्त, 8 जण ताब्यात
Gambling Raid
Gambling Raid(Pudhari File Photo)
Published on
Updated on

जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागातील हॉटेल रॉयल पॅलेस, जे पोलीस अधीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळ स्थित आहे, येथे सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छापा टाकून १९ लाख ९७ हजार रुपयांची रोकड आणि १३ मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. यावेळी ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

छाप्यात आठ जण ताब्यात तर 13 मोबाईल हस्तगत

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. गुरुवार (दि.10) रोजी मध्यरात्री १२.०१ ते १.०० दरम्यान, जयनगर, सागरपार्क मैदानाजवळील हॉटेल रॉयल पॅलेसच्या रूम नं. २०९ मध्ये काही जण 'तीन पत्ती' (झन्ना मन्ना) प्रकारचा हार-जीत जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता, रूम नंबर २०९ ही मदन लुल्ला यांच्या नावावर बुक करण्यात आलेली असल्याचे निष्पन्न झाले. छाप्यात ८ जणांकडून एकूण १९,९७,००० रुपयांची रोकड आणि १३ मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले आहेत.

Gambling Raid
Dhule Robbery Case : धुळ्यात दीड कोटींची लूट : 'हवाला प्रकरणात' सहचालकच ठरला मास्टरमाइंड

या प्रकरणी सहा. फौजदार अतुल वंजारी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्र. २५३/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ), ४, ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाणे करत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, संदीप चव्हाण, किशोर पाटील, रविंद्र कापडणे आदींच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news