

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क । नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून या अपघातात २३ वर्षीय तरुणी जयश्री सोनवणेचा हीचा मृत्यू झाला आहे तर जयश्रीचा भाऊ सुमित गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या साखळी अपघातात जयदेव महाले, भारत महाले हे देखील जखमी झाले आहेत. संशयित आरोपी अनिल साळवे या वाहनाचालकाने पिकअप वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. तीन दुचाकी, एक ओमीनी कारसह अन्य आणखी दाेन वाहनांना पिकअपने धडक दिली. संशयित आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली असून तर चालकासोबत मांडीवर असलेल्या त्याच्या मुलाने एक्सलेटर दाबल्याने हा अपघात झाल्याचा वाहनचालकाचा दावा आहे. अपघात प्रकरणी म्हसरूळ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कायद्यात हिट अँड रनचे प्रकरण असेल, तर आरोपीने पोलिसांना कळवले. घटनेतील जखमींना हॉस्पिटलमध्ये नेले किंवा घटनास्थळांवरून पळून गेले तरी सारखीच शिक्षा होत (Hit And Run Law Punishment) होती. दोन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा, अशी तरतूद होती. परंतु आता या कायद्यामध्ये बदल झालाय. तो नेमका काय आहे?
नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, 'हिट अँड रन' प्रकरणात जर आरोपीने पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांना माहिती दिली. जखमींसाठी रुग्णवाहिका बोलावली, तर त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होईल. परंतु आरोपी घटनास्थळावरूव पळून गेला तर त्याला दहा वर्षांचा तुरुंगवास होईल आणि दंड देखील ठोठावला जाईल, असे नमूद आहे.
1 जुलै 2024 पूर्वी हिट अँड रन प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) कलम 279 (निष्काळजीपणे वाहन चालवणे), 304 A (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) आणि 337 - 338 (जीवन धोक्यात आणणे) अंतर्गत खटले नोंदवले जात (Hit And Run Fine) होते. आयपीसी अंतर्गत दोन वर्षांचा कारावास आणि दंडाची तरतूद होती. काही विशेष प्रकरणांमध्ये आयपीसीचे कलम 302 देखील जोडले जात होते.
नवीन हिट अँड रन (Accident News) कायद्यानुसार अपघातानंतर पोलिसांना न सांगता वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला, तर त्याला दहा वर्षांचा कारावास आणि 7 लाख रुपयांचा दंड देखील होऊ शकतो. हा गुन्हा जामीनपात्र आहे.