Goa Nightclub Fire | अग्नीचे 'बॅले' तांडव !

Goa Nightclub Fire | या नाईट क्लबमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येते. वीकेंडला शनिवार आणि रविवारी तर हा नाईट क्लब हाउसफुल्ल असायचा.
Goa Nightclub Fire Case
Goa Nightclub Fire Case
Published on
Updated on
Summary

नाईट क्लबमधील अनेकांनी 'महबूबा... महबूबा' या गाण्यावर बॅले डान्स करणाऱ्या नर्तकीच्या ठेक्यावर ठेका धरला होता. परंतु, कुणाच्या ध्यानीमनीही नव्हते की, अवघ्या काही क्षणात आपल्या काळजाचाच ठोका चुकणार आहे, आपला हा शेवटचाच डान्स असणार आहे; पण व्हायचं ते घडलंच. कुणाच्यातरी चुकांमुळे २५ निष्पाप माणसांना आपले जीव गमवावे लागले. गोव्यातील हडफडे (आर्पोरा) येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' या रेस्टॉरंट अँड नाईट क्लबला लागलेल्या आगीत २५ जणांचा बळी गेला, तर ५ जण जखमी झाले. संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारी ही एवढी मोठी घटना केवळ १० सेकंदात घडली आणि होत्याचे नव्हते झाले...

प्रभाकर धुरी, पणजी

या नाईट क्लबमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येते. वीकेंडला शनिवार आणि रविवारी तर हा नाईट क्लब हाउसफुल्ल असायचा. एका एका टेकालावरून लाख रुपयांचा गल्ला सहज जमा व्हायचा. देशातील श्रीमंत आणि अतिश्रीमंत पर्यटकांचा येथे राबता असायचा.

Goa Nightclub Fire Case
Ganja Seized : धरणगावजवळ साडेसात किलो गांजा जप्त

क्लबचा मालक थायलंडला पसार!

रेस्टॉरंट व नाईट क्लबचे मालक असलेले सौरव व गौरव लुथरा हे दोघे बंधू अनितांडवाच्या रात्रीच पहाटे ५.३० वाजता फुकेत (थायलंड) ला पळाले आहेत. गोवा पोलिसांचे एक पथक त्यांना पकडण्यासाठी दिल्लीला गेले होते, मात्र त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. पोलिसांनी त्यांच्या घराच्या दरवाजावर नोटीस चिकटवली असून, त्यांच्यासाठी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

शनिवार, दि.६ डिसेंबर रोजी रात्री या नाईट क्लबमध्ये नेहमीसारखाच माहोल होता. स्टेजवर वाज्ञाकिस्तान वैधील बँले डान्सर क्रिस्टीना शेख नृत्य करत होती. तिच्या दिलखेचक अदांनी पर्यटक पायाळ झाले होते. दिवसभरातील हा तिचा दुसरा परफॉर्मन्स होता. पर्यटक मद्याचा मीट मेत तिच्या मादक अदांना प्रतिसाद देत असतानाच अचानक ती ज्या स्टेजवर नृत्य करत होती त्याच्या वरच्या भागात स्पॉट लाईटच्या जवळ अचानक आग लागल्याचे दिसले.

कुणीतरी ओरडले, आग, आग आणि एकच पळापळ झाली. त्यानंतर केवळ १० सेकंदातच आग सगळीकडे पसरली आगीचे लोळ आणि धुराचे लोट यामुळे एकच गोंधळ उडाला. कुणाला कुठे जायचे ते कळेना, क्रिस्टीना बेन्जिंग रूममध्ये जाण्यासाठी पळत असताना एका क्रू मेंबरने तिचा हात पकडून तिला बाहेर नेले आणि तिचा जीव वाचला.

पण, सगळेच नशिबवान नव्हते. तळमजला आणि तळघर (स्वयंपाकघर) या सुमारे ३०० चौरस मीटर भागात केवळ आग आणि चूर भरून उरला होता. धुरामुळे काहीच दिसत नव्हते; धुराच्या जागी आता विषारी वायू जमा होत होता. कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साईड याचे प्रमाण वाढल्याने ऑक्सिजनचे प्रमाण घटू लागले. नाईट क्लबचे कर्मचारी आणि पर्यटकांना श्वास घेणे कठीण होऊ लागले आणि गुदमरून व होरपळून एकूण २५ जणांचा बळी गेला. त्यात नाईट क्लबचे २० कर्मचारी होते, तर ५ पर्यटक होते.

पर्यटकांमध्ये १ कर्नाटकचा व १ दिल्लीचा होता. नाईट क्लबमधील कर्मचारी उत्तराखंड, झारखंड, नेपाळ, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथील होते. पोटासाठी गाव सोडून गोव्यात आलेल्यांना आपला जीव गमवावा लागला. एवढे मोठे अग्नितांडव आणि त्यात गेलेले इतके बळी गोव्याने पहिल्यांदाच पाहिले. यात त्या बिचाऱ्या कर्मचारी आणि पर्यटकांचा काय दोष होता? दोष असेल तर तो नाईट क्लब चालवणाऱ्या मालक आणि व्यवस्थापनाचा. त्यांनी 'फायर सेफ्टी' चे निकष पूर्ण न करता क्लब बेकायदेशीरपणे चालवला. लोकांचा आक्रोश, संबंधित पंचायतीची भूमिका लक्षात न घेता विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या क्लबकडे डोळेझाक करणाऱ्या सरकार आणि संबंधित विभागाचा. या सगळ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि बेफिकिरीमुळे २५ निष्पापांचे प्राण गेले आहेत.

स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, हा क्लब बेकायदेशीर असूनही राजकीय आशीर्वादामुळे चालू होता. क्लबच्या गेटसमोरील सतत होणाऱ्या बेकायदा पार्किंगवरून स्थानिक ग्रामस्थ आणि क्लब चालक यांच्यात अनेकदा संघर्षही झाला होता. या बेकायदेशीर नाईट क्लबच्या पाडकामाचे आदेशही देण्यात आले होते; मात्र वकिलांच्या जोरावर त्या आदेशाला क्लब मालक आणि चालकांनी स्थगिती मिळवली होती. या स्थगितीच्या जोरावर गेल्या दीड वर्षांपासून हा क्लब सुरक्षेचे कुठलेही निकष न पाळता राजरोस सुरू होता. अग्नितांडवात २५ जणांचा बळी गेला आणि प्रशासन खडबडून जागे झाले. चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या रेस्टॉरंट व नाईट क्लबला बेकायदेशीरपणे परवाने देऊन मदत केल्याचा ठपका ठेवून तत्कालीन पंचायत संचालक सिद्धी हलणकर, तत्कालीन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मळिंगे आणि हडपाडे मागोवा पंचायतीचे तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांना शनिवारी रात्री उशिरा हडकाफडकी निलंबित करण्यात आले. तर क्लबच्या चौघा व्यवस्थापकांसह एका सरव्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे. चौघा व्यवस्थापकांना ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर तिघा निलंबित कर्मचाऱ्यांना पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते; मात्र ते हजर राहिलेले नाहीत.

Goa Nightclub Fire Case
Jalgaon Crime: इन्स्टाग्रामवरील रिलमुळे 18 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी पाच जण ताब्यात

अग्नितांडवानंतर अग्निशमन दलाकडून या नाईट क्लबची पाहणी करण्यात आली. त्यांनी त्यांचा तांत्रिक अहवाल जाहीर केला आहे. क्लबमधील आतील भागात वापरलेली साधने, लाकडी पटल, विभाजने, सजावट ही अत्यंत ज्वलनशील होती. रेस्टॉरंट आणि बार परिसरात इंधनाची घनता अधिक होती. शिवाय ज्वलनशील फर्निचर आणि प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे आग पटकन लागली आणि सगळीकडे पसरली.

ओव्हरलोड सर्किट, नॉन-फायर-रेटेड केबल इन्सुलेशन, जुनाट किंवा निष्कृष्ट दर्जाचे वायरिंग, अवशिष्ट करंट उपकरणे आणि सर्किट ब्रेकर्सचा अभाव, नियतकालिक विद्युत तपासणी आणि प्रमाणपत्राचा अभाव ही सर्व त्रुटी पाहणीत आढळल्या. अग्निशमन विभागाने ही आग आवश्यक अग्नि-प्रतिबंधक काळजी न घेतल्याने शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीवेळी पडलेल्या ठिणगीमुळे लागली असण्याची शक्यताही वर्तवली आहे. या क्लब आणि रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरात केवळ एकच दरवाजा होता.

शिवाय हवा येण्या-जाण्याची सोय नव्हती. क्लबमधून बाहेर पडण्यासाठी स्पष्ट दिसणारा प्रकाशमान एक्झिट फलक नव्हता. आपत्कालीन अलार्म आणि प्रकाशाची व्यवस्था नव्हती. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून २५ जणांना आपला जीव गमवावा लागला. राज्यातील पॅनिक आणि संबंधित प्रशासन, क्लब व्यवस्थापन यांनी योग्य दक्षता न घेतल्याने आणि सगळ्या अनधिकृत गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने जीवित आणि वित्तहानी झाली. क्लब मालक गर्भश्रीमंत आहे; त्याला काहीही फरक पडणार नाही. पण भ्रष्ट आणि मुर्दाड व्यवस्थेमुळे जे २५ बळी गेलेत, त्यांच्या वाऱ्यावर सोडलेल्या कुटुंबाला आता सांभाळणार कोण हा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news