पुजारी गँगची अखेर!

पुजारी गँगची अखेर!
Ravi Pujari and Suresh Pujari
पुजारी गँगची अखेर! Ravi Pujari and Suresh Pujari
नरेंद्र राठोड, ठाणे

गँगस्टर रवी पुजारी व सुरेश पुजारी या दोघा गुंडांनी ठाण्यात आपल्या काळ्या धंद्याची मजबूत पकड बनवली होती. या दोघा गुंडांनी ठाणे ते बदलापूर या पट्ट्यात आपले काळे कारनामे मोठ्या प्रमाणात सुरू केले होते. रवी पुजारी त्यावेळी अनेक नामवंत बिल्डर अन् व्यापार्‍यांकडून दरमहा कोट्यवधीची रक्कम प्रोटेक्शन मनी म्हणून उकळत होता. बिल्डरच नव्हे, तर चक्क नगरसेवक, आमदार अशा लोकप्रतिनिधींनादेखील खंडणीसाठी धमकावण्याइतपत त्याची मजल पोहोचली होती.

Ravi Pujari and Suresh Pujari
Jalgaon Crime News|चोरट्याने दुचाकीच्या डिक्कीतून लांबवले अडीच लाख

पुजारी गँग इतकी निर्ढावली

याच काळात पुजारी गँग इतकी निर्ढावली होती, ते पोलिसांनादेखील जुमानत नव्हते. या काळात पुजारी गँगला काही स्थानिक पोलिस अधिकारी मदत करीत असल्याच्या तक्रारी काही बिल्डरांनी त्यावेळी केल्या होत्या. मात्र, रवी पुजारी यास भारतीय तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर त्यास मदत करणारे सारेच गुंड पडद्याआड गेले. त्यानंतर सुरेश पुजारी यासदेखील गजाआड करण्यात यश मिळाल्याने संपूर्ण पुजारी गँग संपुष्टात आल्याचे चित्र आहे.

ऐंशी व नव्वदच्या दशकात खंडणी अन् प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली लाखो-कोट्यवधी रुपये उकळण्याचा धंदा अंडरवर्ल्डमध्ये मोठ्या तेजीत होता. मात्र, काळानुरूप हा प्रोटेक्शन मनीचा धंदा पोलिसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी मागील काही वर्षांत तो मोडूनदेखील काढला.

Ravi Pujari and Suresh Pujari
Jalgaon Crime |किरकोळ कारणावरुन १८ वर्षीय युवकावर विळ्याने हल्ला

मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात प्रोटेक्शन मनीचा धंदा

मुंबईनंतर ठाणे जिल्ह्यात प्रोटेक्शन मनीचा हा गंधा धंदा रुजवण्यासाठी काही गुंड प्रयत्नशील होते. त्यात रवी पुजारी आणि सुरेश पुजारी हे दोघे गँगस्टर आघाडीवर होते. त्यापैकी रवी पुजारी यास पश्चिम आफ्रिकेतल्या सोनेगलमधून तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात येऊन त्यास भारतात आणण्यात आले आहे. रवी पुजारीवर ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत उल्हासनगर येथील केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा यांच्या हत्येसह हत्येचा प्रयत्न, खंडणी, धमकी असे पंचवीसहून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्यापैकी 16 गुन्ह्यांत त्याच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. रवी पुजारीने काही स्थानिक हस्तकांच्या मदतीने ठाणे जिल्ह्यातील बिल्डर व व्यावसायिकांना खंडणीसाठी सळो की पळो करून सोडले होते. फक्त बिल्डर आणि व्यावसायिकच नव्हे, तर राजकीय नेत्यांनादेखील खंडणीसाठी धमकावण्याइतपत त्याने मजल गाठली होती.

Ravi Pujari and Suresh Pujari
Jalgaon Crime|पारोळ्यात गावठी पिस्तूलासह दोन जणांना अटक

उल्हासनगर येथील नगरसेवकासह उल्हासनगर, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, कळवा आदी भागातील अनेक बिल्डर व व्यावसायिकांना त्याने खंडणीसाठी धमकावले होते. याच दरम्यान रवीने खंडणी देण्यास नकार देणार्‍या उल्हासनगर येथील केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा यांची आपल्या हस्तकामार्फत गोळ्या घालून हत्या घडवून आणली होती.

पुजारी गँगमध्ये नंबर दोनवर कुख्यात गुंड सुरेश पुजारी

पुजारी गँगमध्ये नंबर दोनवर असलेला कुख्यात गुंड सुरेश पुजारी याने 2015 ते 2018 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आदी भागातील बिल्डर व व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार सुरू केले होते. याच कालावधीत खंडणीसाठी धमकी दिल्याचे अनेक गुन्हे सुरेश पुजारीवर दाखल करण्यात आले आहेत; तर उल्हासनगरमधील एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणीदेखील सुरेश पुजारीवर गुन्हा दाखल आहे. फिलिपाईन्समध्ये बसून खंडणीची सूत्रे हलविणारा सुरेश पुजारीला अटक करून भारतात आणण्यात आले आहे. तो सध्या तुरुंगात आहे.

व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार

पुजारी गँगमध्ये नंबर दोनवर असलेला कुख्यात गुंड सुरेश पुजारी याने 2015 ते 2018 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आदी भागातील बिल्डर व व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार सुरू केले होते. याच कालावधीत खंडणीसाठी धमकी दिल्याचे अनेक गुन्हे सुरेश पुजारीवर दाखल करण्यात आले आहेत; तर उल्हासनगरमधील एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याप्रकरणीदेखील सुरेश पुजारीवर गुन्हा दाखल आहे. फिलिपाईन्समध्ये बसून खंडणीची सूत्रे हलविणारा सुरेश पुजारीला अटक करून भारतात आणण्यात आले आहे. तो सध्या तुरुंगात आहे.

गुन्हेगारी भाऊबंदकी

कुप्रसिद्ध गुंड रवी पुजारी आणि सुरेश शेट्टी ऊर्फ पुजारी हे दोघेही सख्खे भाऊ नसून त्यांचे फक्त आडनाव सारखे आहे. या आडनावामुळेच रवी व सुरेश पुजारी सख्खे भाऊ असल्याचा अनेकांचा समज आहे. दोघेही भाऊ नसले, तरी त्या दोघांची गुन्हेगारी क्षेत्रात भाऊबंदकी असून, हे दोघे ‘पुजारी ब्रदर’ म्हणूनच अंडरवर्ल्डमध्ये ओळखले जातात. रवी व सुरेश पुजारी यांनी सोबत एकाच गँगमध्ये बराच काळ काम केले. नंतर मात्र दोघे वेगळे झाले व त्यांनी आपापल्या स्वतंत्र गँग उभ्या केल्या होत्या. रवी व सुरेश वेगळे झाल्यानंतरदेखील त्यांची कामाची पद्धत मात्र सारखाचीच होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news