Jalgaon Crime |किरकोळ कारणावरुन १८ वर्षीय युवकावर विळ्याने हल्ला

सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
crime news
किरकोळ कारणावरुन झालेल्या वादात युवकावर विळ्याने हल्ला.File Photo

जळगाव : किरकोळ कारणावरून मजुरांमध्ये झालेल्या वादात एकाने विळ्याने वार करून एका युवकास गंभीर जखमी केल्याची घटना दि. 23 रोजी रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summary

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथे ही घटना घडली.

मजुरांमध्ये किरकोळ कारणावरुन झालेला वाद टोकाला गेला.

एकावर विळ्याने वार केल्याने तो जखमी झाला.

अन् वाद आणखी वाढला

याबाबतचे वृत्त असे की, रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथील प्रिंपी रस्त्यावरील जय भोले तोल काट्यावर केळीने भरलेल्या वाहनाचे वजन करण्याच्या कारणावरून विकी यशवंत वाघ रा. आहिरवाडी व रियाज रफिक तडवी यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत जाऊन विकी याने रियाज (वय १८) यास मानेवर विळ्याने मारून प्राणघातक हल्ला केला. तसेच गणेश देविदास वाघ, विशाल खुशाल गोमटे, नितीन गोमटे, करण तायडे, सिद्धार्थ भालेराव, मंगल पाटील यांनी फिर्यादी सबदर तडवी व रियाज यास चापटा बुक्यांनी मारहाण केली.

crime news
जळगाव: १० हजारांची लाच घेताना पीएसआय ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

दंगलीचा गुन्हा दाखल

या बाबत सबदर हैदर तडवी रा. भोकरी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक तुषार पाटील करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news