

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर येथील 'मुक्ताई' बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी सोमवार (दि.27) मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी घरफोडी घटना उघडकीस आली आहे. या घरफोडीत चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मिळून सुमारे ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरीला गेलेल्या ऐवजामध्ये ३५ हजार रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे.
चोरीला गेलेला मुद्देमाल असा...
सोन्याचे दागिने: सोन्याची साखळी: २० ग्रॅम
सोन्याचे कर्णफुले: ४ ग्रॅम (दोन जोड)
कानातले खडे: ४ ग्रॅम
सोन्याची अंगठी: ४ ग्रॅम
गळ्यातील साखळी: १० ग्रॅम
अंगठ्या: ५ ग्रॅमच्या चार नग
एकूण सोन्याचे दागिने: ६ लाख ७० हजार रुपये किमतीचे (अंदाजे)
चांदीचे दागिने/वस्तू: चांदीची गदा: १ किलो
चांदीचे त्रिशूल: १ किलो
चांदीची तलवार: २ किलो
चांदीचे ब्रासलेट: १ किलो २०० ग्रॅम
चांदीचा रस (पाण्याचे ग्लास): २ किलो, सहा ग्लास
रोख रक्कम: ३५ हजार रुपये
एकूण चोरीला गेलेला ऐवज: सुमारे ६ लाख ७० हजार रुपयांचे दागिने आणि ३५ हजार रुपये रोख रक्कम.
स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) पाच पथके तातडीने चोरीचा तपास करण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. तसेच, चोरट्यांचा माग काढण्यासाठी शिवराम नगर आणि परिसरातील प्रत्येक बंद घराजवळील आणि मुख्य रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कसून तपासणी केली जात आहे. पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी तपासाची दिशा ठरवून लवकरात लवकर चोरट्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याच्या घरी झालेल्या या धाडसी चोरीमुळे जळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर तसेच पोलीस गस्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी तातडीने वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.