

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क । नाशिक रोड भागात पुन्हा एका युवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन जणांवर प्राणघातक हल्ला झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी आहे. जुन्या भांडणाची कुरापत काढून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून. हितेश डोईफोडे या युवकाचा हल्ल्यात झाला मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हल्ला करून संशयित स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.