

(क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सांगली)
हर्वे क्लकले या सायकियाट्रिस्ट डॉक्टरांनी एक पुस्तक लिहिले आहे… 'द मास्क ऑफ सॅनिट'- शहाणपणाचा मुखवटा! गुन्हेगारी वर्तन करणारे हे असे शहाणपणाचे मुखवटे घालून हिंडत असतात!! पण आतून ते असतात मनोरोगी किंवा सायकोपॅथ. हार्वे क्लकलेचे हे मत बनले कारण त्याने एका गुन्हेगाराचा मनोवेध घेतला होता, ज्याचे नाव होते टेड बंडी. (Crime Article)
टेड बंडीने जवळपास 12 स्त्रियांचा खून केला होता. त्यांना फसवून अज्ञात स्थळी नेणे, त्यांच्यावर बलात्कार करणे, हत्याराने वार करणे, डोके धडावेगळे करणे, त्यांचे शिर घरामध्ये नेऊन ठेवणे आणि धडाबरोबर मेल्यानंतरही संभोग करणे… असे क्रूर प्रकार तो करायचा. साधारणपणे 30 च्या आसपास स्त्रियांचा खून त्याने केला असावा, असा कयास बांधला जातो. विशेष म्हणजे टेड बंडी याने पदवी शिक्षण घेतले होते. सायकॉलॉजीमध्ये शिक्षण घेतले होते आणि लॉ कॉलेजलादेखील तो गेला होता. (Crime Article)
हर्वे क्लकले यांनी अतिशय सखोल संशोधन करून सायकोपॅथीचे काही कंगोरे निदर्शनास आणून दिले होते. गुन्हेगारी वृत्तीचे मनोरोगी हे अनेक लक्षणांनी ग्रासले गेलेले असतात. समाजविघातक लक्षणांबरोबरच दयामाया वगैरे त्यांच्याकडे काही नसते. पश्चात्ताप नावाची गोष्ट त्यांच्या गावीदेखील नसते. बेदरकार आणि बेबंद वृत्ती या जोडीने अहंकार हे लक्षण यांच्यात मुरलेले असते. हार्वे क्लकले यांनी हे त्यावेळी निदर्शनास आणून दिले म्हणूनच नंतर वर्तन रोगाच्या क्रमिक पुस्तकात गुन्हेगारांना कोणता मनोरोग झालेला असतो, ते समाविष्ट केले गेले.
मानसिक रोगाच्या बाबतीत महत्त्वाचे मानले गेलेले 'डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स' किंवा छोट्या शब्दात सांगायचे झाले तर 'डी.एस.एम.' या पुस्तकात गुन्हेगारी वृत्तीचे रोग नमूद करण्यात आले आहेत. समाजविघातक व्यक्तिमत्त्व दोष, समाजविरोधी व्यक्तिमत्त्व दोष अशा रोगांच्या वर्गीकरणासाठी हार्वे क्लकले हे कारणीभूत ठरले आहेत.
जगभरातील गुन्हेगारांमध्ये समान लक्षणे आढळून येतात आणि याविषयी त्यांच्या गुन्हेगारीचे मोजमापदेखील विशिष्ट अशा चाचण्यांमधून करण्यात आले आहे. कुक आणि मिशी या संशोधकांनी त्रिगुणी मॉडेल मांडले आहे. घमेंडखोरपणा आणि फसवाफसवीची वृत्ती, बेजबाबदारपणा आणि पश्चात्तापाचा मागमूसही नसणे आणि सनकीपणा असणे ही तीन प्रमुख लक्षणे सर्व गुन्हेगारांमध्ये आढळतात.
गुन्हेगार हे बर्याच वेळा आर्थिकद़ृष्ट्या दुसर्यावर अवलंबून असतात. त्यांची स्वतःची अशी कमाई नसते. व्यसनाधीनता ही बहुसंख्य गुन्हेगारांमध्ये आढळते आणि दीर्घ काळाचे वास्तववादी ध्येय असे कोणतेही नसते. सगळं काही उथळपणाचं असतं! आणि या सगळ्यांवर कळस असतो तो हिंसेचा. कोणत्या प्रकारची असते ही हिंसा?