टीईटी गैरव्यवहार प्रकरण- व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमधूून चौघांचे संबंध झाले उघड | पुढारी

टीईटी गैरव्यवहार प्रकरण- व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमधूून चौघांचे संबंध झाले उघड

पुणे : पुढारी वृत्तसेवा

टीईटी परीक्षेमध्ये परीक्षार्थींबाबत तत्कालीन राज्य परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे हा व्यवस्थित काम करीत नसून सांगितलेले ऐकत नसल्याच्या तक्रारी जी. ए. सॉफ्टवेअरच्या डॉ. प्रीतीश देशमुख याने तत्कालीन शालेय शिक्षण उपसचिव सुशील खोडवेकर याच्याकडे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.सायबर पोलिसांनी नुकतीच तत्कालीन शालेय शिक्षण उपसचिव सुशील खोडवेकर यांना अटक केली. त्यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर पोलिसांनी पोलिस कोठडी अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

‘युनिक लँड आयडेंटिफिकेशन नंबर’ला चाकणपासून प्रारंभ

सायबर पोलिसांनी तुकाराम सुपे, डॉ. प्रीतीश देशमुख, सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्याकडे केलेल्या तपासात हे चौघेही एकमेकांच्या व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संपर्कात असल्याचे दिसून आले. तसेच मनोज डोंगरे यांच्यामार्फत देशमुख आणि तुकाराम सुपे यांनी सुशील खोडवेकर याला लाखो रुपये दिल्याचेदेखील दिसून आले आहे. चौघांचे व्हॉट्सअ‍ॅप संभाषण तपासले असताना ते एकमेकांशी संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. त्यात काहीवेळा देशमुखने खोडवेकरकडे तुकाराम सुपे यांच्याविषयी तक्रारी केल्या आहेत. सुपे हे सांगितल्याप्रमाणे काम करत नाहीत, असे त्यात म्हटले आहे. सावरीकर आणि देशमुख यांच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

UP election 2022 : समाजवादी म्हणवणारे लोक फक्त परिवारवादी, PM मोदींचे टीकास्त्र

टीईटी गैरव्यवहारात 2019-20 मध्ये वरिष्ठ अधिकार्‍यांनी एजंटांशी संधान साधून तब्बल 7 हजार 880 जणांना पैसे घेऊन पात्र ठरविले होते. त्यांच्याकडून 25 हजारांपासून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे घेण्यात आले आहे. त्यात अनेक क्लास चालकांनी एजंटाची भूमिका बजावली आहे. अशा 30 ते 35 जणांची माहिती सायबर पोलिसांच्या हाती लागली असून, त्याचा शोध घेतला जात आहे. हे प्रमुख एजंट हाती लागल्यानंतर त्यांच्याकडून या संपूर्ण व्यवहारावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा

बुल्‍ली-सुल्‍ली ॲपचा राज्यसभेत मुद्दा उपस्‍थित

राज्यात सौरऊर्जा प्रकल्पांची वाटचाल जोमात

फेसबुक चॅटचे स्क्रिनशॉट्स घेताय मग सावधान!

Back to top button