Cardamom Auction : कॉम्पुटरसमोर, टेबलवर इलायचीचा ढीग! केरळमधील वंदमेडू येथील जगातील सर्वात मोठा इलायची लिलाव पाहून थक्क व्हाल!

डिजिटल स्क्रीनवर लिलाव, पण हातात वेलचीचा सुगंध: ई-लिलावाची कार्यपद्धती पाहण्यासारखी
Cardamom Auction
Cardamom Auction
Published on: 
Updated on: 

Cardamom Auction वेलदोडा किंवा इलायची, वेलची कार्डमन Cardamom ही मसाल्याची राणी आहे. चहापासून कोणत्‍याही मसालेदार पदार्थामध्ये वेलचीचे स्थान अढळ आहे. आपल्याकडे केरळमध्ये सर्वाधिक वेलचीचे उत्‍पादन होते, आणि याच ठिकाणी देशभरातून वेलची खरेदी करण्यासाठी व्यापारी येतात. यामध्ये इडुक्की जिल्ह्यातील 'वंदनमेडू' (Vandanmedu) हे गाव जागतिक स्तरावर वेलचीच्या (Cardamom) सर्वात मोठ्या उत्पादन आणि व्यापार केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याठिकाणी वेलचीचा लिलाव होत असतो. पण लिलावाची पद्धत एकदम हटके असते.

विक्रीची अनोखी पद्धत, ८ सेकंदात पाहणी

लिलाव सुरु असताना शेतकरी त्‍यांचा माल वेलची खरेदीदाराच्या समोर वाटीत किंवा टेबलवर टाकतात. व्यापारी अगदी ७ ते ८ सेकंदात वेलचीची पाहणी करतो व त्‍याची किंमत ठरवतो. आकार, सुंगध यावरुन संबधित शेतकऱ्याच्या मालाची किंमत ठरते. प्रत्‍येक शेतकरी आपली वेलची टेबलवर टाकत असल्याने लिलावा दरम्यान टेबलवर, टेबलखाली वेलचीचा ढिग तयार होतो. एक शेतकरी वेगाने आपला माल व्यापाऱ्या समोर ओळीने टाकत जातो हे पाहण्यासारखे असते.

हा लिलाव ‘स्पायसेस बोर्ड ऑफ इंडिया’च्या नियंत्रणाखाली अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक लिलाव पद्धतीने (e-Auction) पार पडतो. मात्र, हा लिलाव हायटेक कॉम्प्युटर स्क्रीनवर चालत असला, तरी प्रत्येक व्यापाऱ्याच्या टेबलावर प्रत्यक्ष वेलचीचे नमुने ठेवले जातात. डिजिटल युगातही ही पारंपरिक पद्धत का जपली गेली आहे,

स्क्रीनवर आकड्यांचा खेळ, पण हातात प्रत्यक्ष नमुने का?

लिलाव हॉलमध्ये प्रत्येक खरेदीदाराच्या कॉम्प्युटर टर्मिनलसमोर लहान वाट्या किंवा ताटांमध्ये त्या-त्या लॉटमधील वेलचीचे नमुने ठेवले जातात. स्क्रीनवर केवळ लॉट नंबर, एकूण वजन आणि मूळ किंमत दिसते; परंतु मसाल्यांच्या या राणीचा खरा दर्जा केवळ स्क्रीन पाहून ठरवता येत नाही. प्रत्‍यक्ष हाताळूनच तीची किंमत ठरवली जाते.

आकार आणि रंगाची थेट पारख

वेलचीचा बाजारभाव तिच्या आकारावर . ७ मिमी, ८ मिमी वा त्याहून अधिक आणि हिरवेपणावर अवलंबून असतो. समोर ठेवलेल्या नमुन्यावरून वेलची टपोरी (Bold) आहे की हलकी, हे व्यापारी डोळ्यांनी तपासतात. व्यापारी वेलची हाताने दाबून पाहतात. माल योग्य प्रकारे वाळलेला (Crisp) आहे की त्यात दमटपणा शिल्लक आहे, तसेच तिचा नैसर्गिक सुगंध किती तीव्र आहे, हे प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय समजत नाही.

खरेदीदार नमुन्यातील एखादे बोंड फोडून आतील दाणे परिपक्व आणि काळेभोर आहेत की कच्चे आहेत, याची खात्री करतात. ज्या लॉटचा लिलाव स्क्रीनवर सुरू असतो, नेमका तोच सॅम्पल ट्रे टेबलावर फिरवला जातो. यामुळे खरेदीदाराला आपण नक्की कोणत्या मालावर बोली लावत आहोत याची १००% खात्री मिळते.

असा पार पडतो वंदनमेडूचा हायटेक लिलाव

सॅम्पलिंग: शेतकरी किंवा व्यापाऱ्यांचा माल गोदामात आल्यानंतर लिलाव एजन्सी निष्पक्षपणे प्रत्येक लॉटमधून एक छोटा नमुना बाजूला काढते प्रत्येक नमुन्यावर एक विशिष्ट लॉट नंबर असतो, जो थेट व्यापाऱ्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरील लॉटशी जोडलेला असतो. व्यापारी एका हातात वेलची घेऊन तिचा दर्जा तपासतात आणि दुसऱ्या हाताने अवघ्या काही सेकंदांत कीबोर्डवरून आपली कमाल बोली नोंदवतात.

पण एकंदरीत हा लिलाव पाहण्यासारखा असतो ऑगस्ट महिन्यापासून वेलचीची तोडणी मोठ्या प्रमाणावर सुरू होते.या काळात लिलाव केंद्रांवर सर्वात जास्त गर्दी आणि उलाढाल असते. शेतांतून ताजी, वाळवलेली वेलची बाजारात येते, ज्यामुळे दररोज शेकडो टन मालाची आवक आणि लिलाव होतो. दिवाळी, दसरा तसेच आखाती देशांतून निर्यातीची मागणी याच काळात अधिक असते, त्यामुळे बोली चुरशीची ठरते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news