

उत्कृष्ट बेदाणे निर्मितीसाठी द्राक्षाचे योग्य वेल व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच पिकावर जीएचा वापर टाळावा. नत्राचे प्रमाण योग्य ठेवावे, कारण जास्त नत्रामुळे मणी मऊ होतात आणि मण्यातील गरातील घट्टपणा कमी होतो.
जगातील एकूण बदाणे उत्पादनापैकी 50 टक्के उत्पादन अमेरिकेमध्ये होते. तुर्की, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इराण, अफगाणीस्तान, चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांमध्येही मोठ्या प्रमाणात बेदाने निर्मिती होते. प्रामुख्याने थॉमसन सीडलेस या द्राक्षाच्या जातीपासून सुमारे 90 टक्के बेदाणे निर्मिती होते. महाराष्ट्रामध्ये मात्र थॉमसन सीडलेस, तास-ए-गणेश, सोनाका आणि माणिक चमन या जातींपासून बेदाणे तयार केले जातात.
द्राक्षापासून बेदाणे : द्राक्षापासून बेदाणे मुख्यत: गोल्डन ब्लीच पद्धत आणि ऑस्ट्रिलियन डिपिंग आईल पद्धत या दोन पद्धतीने तयार करतात.
ऑस्ट्रेलियन डिपिंग ऑईल पद्धत :
1) 22 ते 24 ब्रिक्स असणार्या पक्व घडाची निवड करून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत.
2) धुतलेली ही फळे इथाईल ओलीएट (20 मि.लि. प्रती लिटर) आणि पोटॅशियम कार्बोनेट (2.4 ग्रॅस प्रती लिटर) यांच्या मिश्र द्रावणात 4-5 मिनिटे ठेवावीत.
3) नंतर फळे ड्रायरमध्ये 55 ते 66 अंश से. तापमानास किंवा सावलीत फळातील पाण्याचे प्रमाण 17 ते 18 टक्के येईपर्यंत सुकवावीत.
4) या पद्धतीने तयार केलेले बेदाणे/मनुके शीतगृहात साठवावेत म्हणजे मनुके काळे पडत नाहीत.
उत्कृष्ट बेदाण्याचे गुणधर्म :
उत्कृष्ट बेदाणे दिसायला सुबक हवेत, रंगात मिसळ नको, हिरवट – पांढरे किंवा बदामी रंगाचे भरपूर लव असलेले, मुलायम, भरपूर गर, मधूर चव, सारखा आकार, मुठीत दाबून सोडल्यास प्रत्येक मणी सुटा झाला पाहीजे, तसेच अशा बेदाण्यांना कुठलाही झोंबणारा वास नसावा.
उत्कृष्ट बेदाणे निर्मितीसाठी :
उत्कृष्ट बेदाणे निर्मितीसाठी द्राक्षाचे योग्य वेल व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. तसेच पिकावर जीएचा वापर टाळावा. नत्राचे प्रमाण योग्य ठेवावे, कारण जास्त नत्रामुळे मणी मऊ होतात आणि मण्यातल्या गरातील घट्टपणा कमी होतो. यासोबत द्राक्षबागेला माफकच पाणी द्यावे. पाणी जास्त दिल्यास बेदाणे साठवणीत चिकट बनतात.
– सतीश जाधव