कुळीथाचा उत्तम पर्याय

कुळीथाचा उत्तम पर्याय

काही वेगळ्या पिकांची लागवड किफायतशीर ठरणारी असते. त्यादृष्टीने हुलग्यांचा अर्थातच कुळीथाचा विचार करायला हवा. राज्यात अवर्षणप्रवण विभागामध्ये बर्‍याच मोठ्या प्रमाणावर माळरानाची, हलकी, उथळ, कमी सुपीक जमीन उपलब्ध आहे. अशा ठिकाणी सुधारित पद्धतीने कुळीथ पीक घेतल्यास जास्त उत्पादन मिळून शेतकर्‍यांना चांगला फायदा होऊ शकतो. पारंपरिक शेती फायदेशीर ठरत नाही हे दिसत असूनही अनेक शेतकरी शेती तंत्रात बदल करण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे असे शेतकरी तीच ती पिके घेतात.

वास्तविक, काही वेगळ्या पिकांची लागवड किफायतशीर ठरणारी असते. त्यादृष्टीने हुलग्यांचा अर्थातच कुळीथाचा विचार करायला हवा. राज्यात अवर्षणप्रवण विभागामध्ये बर्‍याच मोठ्या प्रमाणावर माळरानाची, हलकी, उथळ, कमी सुपीक जमीन उपलब्ध आहे. अशा ठिकाणी सुधारित पद्धतीने कुळीथ पीक घेतल्यास जास्त उत्पादन मिळून शेतकर्‍यांना चांगला फायदा होऊ शकतो. परंतु हे पीक भारी आणि चुनखडीचे प्रमाणा जास्त असलेल्या जमिनीत घेण्याचे टाळावे. मध्यम प्रकारच्या जमिनीत फक्त पावसावरदेखील या पिकाचे चांगले उत्पादन मिळू शकते. पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर वापसा येताच जुनच्या तिसर्‍या आठवड्यात ते जुलैच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत कुळीथची पेरणी पूर्ण करावी.

एक हेक्टर पेरणीसाठी 12 ते 15 किलो बियाणे पुरेसे ठरते. पेरणी दोन ओळीतील अंतर 30 से.मी. आणि दोन रोपांमधील अंतर 10 से.मी. ठेवून करावी. खरे तर हे पीक पूर्ण पावसावर घेता येेते. परंतु काही वेळेस पिकास फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या काळात पावसाने बरेच दिवस ताण दिला तर उत्पादनात फार मोठी घट येेते. अशा वेळेस संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. कुळीथ हे पीक हलक्या जमिनीत घेतले जाते, अशा जमिनीत अन्नद्रव्ये कमी प्रमाणात असतात. अशा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरून द्यावे.

पेरणी करताना पिकाला 15 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद ही खतांची मात्रा मिळण्यासाठी साधारण 75 किलो डायअमोनियम फॉस्फेट प्रती हेक्टर प्रमाणे द्यावे. तणांचा बंदोबस्त होण्यासाठी आंतरगमशागत वेळेवर करावी. ढगाळ हवामानामुळे या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पाने खाणार्‍या किडींचा प्रादुर्भाव दिसला तर या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30 टक्के प्रवाही, 500 मि.ली. 500 लिटर पाण्यातून प्रती हेक्टरला फवारावे. काढणीनंतर कुळीथ उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे.
– जगदीश काळे

logo
Pudhari News
pudhari.news