पशुनिगा जनावरांंचे आजार आणि वनौषधी

पशुनिगा जनावरांंचे आजार आणि वनौषधी

जनावारांचे दूध कमी होणे, कोंबड्यांचे अंडी उत्पादन कमी होणे, शेळ्यांचे वजन कमी होणे अशा बाबी पशुपालकांना सरळपणे व्यावसायिकरीत्या नुकसान करतात. यावर उपचारांचा खर्चपण फार मोठा असतो. परंतु, या लक्षणांवर उपचार अगदी स्वत: पशुपालकास करणे शक्य आहे, यासाठी उपचारांवर औषधी वनस्पतींचा वापर हा उत्तम पर्याय आहे. जनावरातील सर्वसाधारण आजारांवर विविध औषधींचा वापर केला जातो. या वनस्पतींच्या वापराने निश्‍चितच फायदा होतो, हे सिद्ध झाले आहे. जनावरांच्या उत्पादन क्षमतेसंबंधी आजारावर उपचार कसे करावेत, याविषयी जाणून घेऊयात.

सर्वप्रथम जनावरांच्या या आजारांवर उपचार करताना त्याच्या मूळ कारणांवर उपचार करावेत, उदा. खनिज द्रव्यांच्या कमतरतेत कॅल्शियमची मात्रा देणे आदी.

1) जिवंती :- ही वनस्पती दूध उत्पादन वाढण्याकरिता उत्तम औषधी आहे. जिवंती वनस्पतीचा उपयोग कोेंबड्यांमध्ये अंडी
उत्पादन वाढविण्याकरितादेखील उपयुक्‍त आहे. या वनस्पतीची मोठ्या जनावरातील मात्रा-30 ते 40 गॅ्रम, तर लहान जनावरातील मात्रा 15 ते 20 ग्रॅम आहे. दररोज एकवेळा अशा प्रकारे 10 दिवस द्यावी.

2) शतावरी : शतावरी ही वनस्पती दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्‍त आहे. या वनस्पतीची मुळे औषधांमध्ये वापरली जातात. सी वनस्पती स्त्री प्र्रजनन संस्थेत उत्तेजक आहे. मोठ्या जनावरातील मात्रा 30-40 ग्रॅम तर लहान जनावरातील मात्रा 15-20 ग्रॅम, दिवसातून एकवेळा अशी दहा दिवस द्यावी.

3) अश्‍वगंधा : ही वनस्पती टॉनिक म्हणून कार्य करते. संपूर्ण वनस्पती औषधी म्हणून वापरली जाते. संप्रेरकाच्या कमतरतेमुळे दूध कमी होणे या आजारात अश्‍वगंधाचा वापर अत्यंत उपयुक्‍त आहे. मोठ्या

जनावरांमध्ये 15-20 ग्र्रॅम तर लहान

जनावरांमध्ये 8-15 ग्र्र्रॅम अशी मात्रा दिवसातून एकवेळा अशा प्रकारे 10 दिवस द्यावी.

विशेष म्हणजे वरील सर्व वनौषधींचा एकत्रित वापर अत्यंत उपयुक्‍त आहे. याकरिता पुढीलप्रमाणे असावे : 1) जिवंती – 40 ग्रॅम, 2) एकतारी – 40 ग्रॅम 3) अश्‍वगंधा – 20 ग्रॅम या वनस्पतींचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो हे प्रयोगाने सिद्ध झाले आहे.

– सतीश जाधव

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news