

केळी हे महाराष्ट्रातील प्रमुख पीक असून, या पिकाखाली महाराष्ट्रात 83,00 हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्राची सरासरी उत्पादकता 58.2 टन प्रति हेक्टर एवढी आहे, जी राष्ट्रीय उत्पादकतेपेक्षा जास्त आहे. केळी पिकाच्या विविध अवस्थांना अनुरूप तापमान, आर्द्रता, पाऊस, वारा या हवमानाच्या घटकांनुसार लागवडीची वेळ ठरविली जाते. कांदे बाग केळीची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते, मे ते जुलै या कालावधीत केळफूल बाहेर पडते, तर ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत केळी काढणीस तयार होते. कांदे बाग लागवडीपासून मिळणारे उत्पादन मृगबाग लागवडीपासून मिळणार्या उत्पादनापेक्षा कमी असते; परंतु बाजारभाव मात्र चांगले मिळतात. कांदेबाग लागवडीखालील क्षेत्र हे एकूण लागवडीपेक्षा
20 ते 25 टक्के इतके असते.